घोरावडेश्वर डोंगरावरील पाणी समस्या सुटली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घोरावडेश्वर डोंगरावरील
पाणी समस्या सुटली
घोरावडेश्वर डोंगरावरील पाणी समस्या सुटली

घोरावडेश्वर डोंगरावरील पाणी समस्या सुटली

sakal_logo
By

सोमाटणे, ता. ८ ः जलवाहिनीची दुरुस्ती केल्याने घोरावडेश्वर डोंगरावरील पाणीपुरवठा सुरळीत झाल्याने भाविकांची पाण्याची समस्या सुटली. घोरावडेश्वर डोंगरावर शिरगावनजीक पवना नदीतून पूर्वी लहान जलवाहिनीव्दारे पाणीपुरवठा करण्यात आलेला आहे. शिरगाव ते घोरावडेश्वर जलवाहिनीचे अंतर जास्त, उंची अधिक व जलवाहिनी जुनी झाल्याने अनेकवेळा जलवाहिनीत दोष होऊन पाणीपुरवठा बंद होण्याचा प्रकार नेहमीच घडतो. गेल्या अनेक दिवसांपूर्वी जलवाहिनीत दोष होऊन पाणीपुरवठा बंद झाला होता. कोरोनामुळे दर्शनासाठी मंदिर बंद असल्याने पाणी समस्या जाणावली नव्हती. परंतु कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर शासनाच्या आदेशानुसार महिनाभरापासून दर्शनासाठी मंदिरे खुली झाल्यानंतर डोंगरावर दर्शनासाठी भाविकांची संख्या वाढली. परिणामी पाण्याची गरज वाढल्याने पाणी समस्या सुरू झाली
होती. या बाबत ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रकाशित झाले होते. याची दखल व पाण्याची गरज विचारात घेऊन देवस्थानच्या वतीने जलवाहिनी दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला. त्यामुळे भाविकांची पाणी समस्या सुटली. घोरावडेश्वर मंदिर परिसर
पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित असल्याने पाणीपुरवठ्याची कायमस्वरूपी सोय संबंधित विभागाने करावी, अशी मागणी भाविकांनी केली
आहे.

Smt8Sf1.
--------------------------------------------------------------------

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top