
चिंचवडमध्ये पत्नीच्या प्रियकराचा खून
पिंपरी, ता. ७ : अनैतिक संबंधातून पत्नीच्या प्रियकराला दारू प्यायच्या बहाण्याने बोलावून धारदार हत्याराने त्याचा खून केला. हा प्रकार चिंचवड येथे घडला. आरोपीला पोलिसांनी अटक केले आहे. ज्ञानदेव श्रीरंग साठे (वय ४५, रा. चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे खून झालेल्या प्रियकराचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्राधिकरण, निगडी येथे राहणाऱ्या ३६ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी साठे यांची भाची रोहिणी गोकूळ गायकवाड यांनी फिर्याद दिली. आरोपीची पत्नी व साठे यांच्यात अनैतिक संबंध असल्याचे आरोपीला समजले. याचा त्याला राग होता. दरम्यान, आरोपीने शनिवारी (ता.५) रात्री साडेदहाच्या सुमारास साठे यांना फोन करून बोलावून घेतले. चिंचवडेनगर येथे त्यांच्यावर धारदार हत्याराने गळ्यावर, छातीवर, पोटावर, पाठीवर व हातावर वार करून खून केला. चिंचवड पोलिसांनी तपास करून आरोपीला अटक केले.
------------------------
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..