वाल्हेकरवाडीत अनधिकृत बांधकामावर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाल्हेकरवाडीत अनधिकृत बांधकामावर कारवाई
वाल्हेकरवाडीत अनधिकृत बांधकामावर कारवाई

वाल्हेकरवाडीत अनधिकृत बांधकामावर कारवाई

sakal_logo
By

पिंपरी, ता. ४ : वाल्हेकरवाडीतील प्रभाग क्र. १७ या ठिकाणी सुरू असलेल्या, आरसीसी अनधिकृत बांधकामावर (ता.४) मंगळवारी कारवाई करण्यात आली. या बांधकामांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाकडून एकूण १५९३३ चौरस फूट बांधकाम पाडण्यात आले.
वाल्हेकरवाडीतील छत्रपती संभाजी महाराज चौक, सर्व्हे नंबर ८३, १११,११६, १११ मधील दोन बांधकामे, वाल्हेश्वर कॉलनी, सायली कॉम्पलेक्सरोड मधील बांधकामे पाडली. यातील १ पत्राशेड, इतर आरसीसी बांधकाम होते. चिंचवड पोलिस ठाण्याच्या माध्यमातून ही कारवाई झाली. कार्यकारी अभियंता संजय भोसले, उपअभियंता दीप करपे, कनिष्ठ अभियंता प्रवीण धुमाळ, मनाली स्वामी यांच्यासह ७ बीट ऑफिसर, १० महापालिका कर्मचारी पथक, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे कर्मचारी, १२ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाई केली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top