विद्यार्थ्यांचे लसीकरण वेगात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांचे लसीकरण वेगात
विद्यार्थ्यांचे लसीकरण वेगात

विद्यार्थ्यांचे लसीकरण वेगात

sakal_logo
By

पिंपरी, ता. १२ ः शहरात कोरोना प्रतिबंधासाठी १२ ते १४ वर्षे वयोगटातील लसीकरण मोहिमेने वेग घेतला. १४ हजार ६४९ किशोरवयीन मुलांचे लसीकरण पूर्ण झाले. त्या तुलनेत १५ ते १७ वर्ष वयोगटातील लसीकरणाला सुरवात होऊन दोन महिने झाले. मात्र अद्याप ४२ टक्के युवकांचा पहिला तर ६३ टक्के लाभार्थ्यांचा दुसरा डोस बाकी राहिला आहे.
कोरोना संसर्गापासून किशोरवयीन मुलांचा बचावासाठी १७ मार्चपासून शहरात १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले. संसर्गाचा घटलेला वेग, शाळा, परीक्षा सुरू असल्याने मोहिमेच्या सुरुवातीला लसीकरणाला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. मात्र त्यानंतर लसीकरण मोहिमेतील अधिकारी पदाधिकाऱ्यांनी शाळा स्तरावर जनजागृती कार्यक्रम हाती घेऊन किशोरवयीन मुले, पालकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्यास सुरवात केली. त्यानंतर मोहिमेला प्रतिसाद वाढला व वीस दिवसांत १४ हजारांहून अधिक मुलांनी कॉर्बोव्हॅक्स लसीचा पहिला डोस घेतला. उद्दिष्टाच्या तुलनेत १७ टक्के लसीकरण पूर्ण झाले. मोहिमेच्या प्रारंभी ६० हजार डोस या टप्प्यासाठी शहरात आणले होते. त्यामुळे सध्याही मुबलक लस साठा आहे. दररोज ५०० डोस होणे अपेक्षित आहे. परंतु नित्य १५ विद्यार्थी डोस घेत आहेत, अशा परिस्थितीमध्ये डोसचे उदिष्ठ गाठणे अवघड झाल्याचे चित्र आहे.
दरम्यान, तीन जानेवारी २०२२ पासून १५ ते १७ वर्षे वयोगटातील लसीकरणाला सुरवात करण्यात आली. शहरात या गटातील १ लाख १३ हजार १७० मुले लसीकरणाचा टप्पा पार केला आहे. पहिल्या टप्प्यात ६८ हजार २६७ मुलांनी म्हणजेच ५८ टक्के तर दुसऱ्या टप्प्यात ४३ हजार ३६९ म्हणजेच ३७ टक्के विद्यार्थ्यांनी डोस घेतला आहे. त्यामुळे विविध भागात वाढीव सत्र सुरू करून, शाळा- महाविद्यालयांत लसीकरण मोहीम राबविणे आवश्‍यक आहे.

६३ टक्के मुलांचा दुसरा डोस बाकी
१५ ते १७ वर्षे वयोगटातील लसीकरणाचे उद्दिष्टापैकी ६३ टक्के मुलांचा दुसरा डोस बाकी आहे. दुसरा डोस बाकी असणाऱ्या मुलांची संख्या तुलनेत अधिक आहे. आतापर्यंत ४३ हजार ३६९ मुलांनी दुसरी डोस घेतलेला आहे. महापालिकेकडून नागरिकांना दुसऱ्या डोसची आठवण करून देण्यात येत आहे. मात्र, अद्यापही अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही.

आकडे बोलतात
१२-१४ वयोगट किती डोस पूर्ण
पहिला डोस - १४, ६४९
दुसरा डोस -००
एकूण टक्केवारी - १७ टक्के

१५-१७ वयोगट किती डोस पूर्ण
पहिला डोस - ६८२६७
(५८ टक्के)
दुसरा डोस -४३३६९
(३७ टक्के)

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top