सकाळ वास्तू लोगो वापरावा. गृहखरेदीदारांना चांगली संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सकाळ वास्तू लोगो वापरावा.

गृहखरेदीदारांना चांगली संधी
सकाळ वास्तू लोगो वापरावा. गृहखरेदीदारांना चांगली संधी

सकाळ वास्तू लोगो वापरावा. गृहखरेदीदारांना चांगली संधी

sakal_logo
By

सकाळ वास्तू प्रदर्शनाच्या निमित्ताने बांधकाम व्यावसायिक व ग्राहकांना कायमच उत्तम संधी मिळत असते. विनायक एंटरप्राईजेसने पिंपळे गुरव व पिंपळे सौदागर या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उत्तम व दर्जेदार अशा ईस्टर्न रिव्हर रेसिडेन्सी व साम्राज्य असे गृहप्रकल्प सुरू केले आहेत. एक लाख स्क्वेअर फुटावर वसलेला प्रशस्त आणि उत्तम वातावरण असलेला, दर्जेदार व ग्राहकाभिमुख सेवा देणारा हा शहरातील एकमेव गृहप्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या जवळच मॉल, नाट्यगृह, मेट्रो व रेल्वे स्टेशन आहे. त्यामुळे नोकरदार, गृहिणी आणि विद्यार्थ्यांना कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने फायद्याचे ठरते. सध्या दर स्थिर आहेत. त्यामुळे भविष्यात घराचे दर वाढण्यापूर्वी आपल्या घराचे स्वप्न साकारण्याची संधी ग्राहकांनी चुकवू नये. त्यामुळे ग्राहकांनी आवर्जून प्रदर्शनाला भेट द्यावी.
- विनायक गारवे,
विनायक एंटरप्राइजेस (५६७३७)
------------------
ग्राहकांनी स्वप्न साकारावे
आपल्या स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करण्याची संधी सकाळ वास्तू प्रदर्शनाच्या निमित्ताने आम्हाला मिळाली असून, उत्तम दर्जा आणि किंमत यांची दुहेरी सांगड असलेले विविध गृहप्रकल्प नम्रता ग्रुपने साकारले आहेत. रेडी पझेशन संकल्पनेमुळे ग्राहकांना घर बुकिंग करताना लगेच ताबा मिळणार आहे. कर्जाचे हप्ते व व्याज या दोन्हींमधून ग्राहकांची आर्थिक बचत होणार आहे. तळेगाव, वराळे व कान्हेफाटा येथे रेडी पझेशन, सर्वसोयीसुविधांनी युक्त असे फ्लॅट उपलब्ध आहेत. प्रदर्शनस्थळी आपल्या घराचे बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना अडीच ते पाच लाख रुपयांपर्यंतच्या सवलतीचा लाभ घेता येणार आहे. घर घेणाऱ्यांसाठी ही शाश्‍वत संधी आहे. त्यामुळे ‘सकाळ वास्तू प्रदर्शना’ला भेट देत आपल्या घराचे स्वप्न साकार करा.
- राज शहा,
नम्रता ग्रुप (५६७६३)
------------
कुटुंबीयांसमवेत भेट द्यावी
‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने दरवर्षी बांधकाम व्यावसायिक व ग्राहक यांच्यासाठी ‘सकाळ वास्तू प्रदर्शना’चे आयोजन केले जाते. मंत्रा वास्तू प्रा. लि. ही स्ट्रॅटेजिक पार्टनर म्हणून सध्या कार्यरत आहे. मोशी, चिखली, रावेत, गहुंजे आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकसित होणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरांच्या जवळ अतिशय उत्तम व दर्जेदार गृहप्रकल्प साकारत आहे. या गृहप्रकल्पात उत्तम ॲमिनिटीजसह प्रशस्त जागा देण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वाना परवडतील अशा बजेटमध्ये वन, टू, थ्री आणि फोर बीएचके फ्लॅटस उपलब्ध करून दिले आहेत. ‘सकाळ’च्या निमित्ताने ग्राहकांना दोन वर्षानंतर स्वतःचे घर घेण्याची नामी संधी चालून आली आहे. ग्राहकांनी नक्की या प्रदर्शनाला आपल्या कुटुंबीयांसमवेत भेट द्यावी. आपल्या बजेटप्रमाणे घर निवडून घराचे स्वप्न साकार करावे.
- दिनेश जहागीरदार,
मंत्रा वास्तू प्रा.लि. (५६९१६)
---------
विविध गृहप्रकल्पांची माहिती
़पिंपरी चिंचवड शहराचा वाढता विस्तार पाहता भविष्यात अधिकाधिक घरांची आवश्‍यकता लागणार आहे. औद्योगिकीकरणामुळे शहरामध्ये राहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ऐश्‍वर्यम हमारा हा गृहप्रकल्प ग्राहकांच्या सेवेसाठी तयार आहे. आर्थिक बजेट नुसार उत्तम व दर्जेदार घरे देण्यासाठी गृहप्रकल्प उभारले आहेत. सर्वसामान्यांना घरांचे स्वप्न साकार करीत असताना सर्वसोयी सुविधा युक्त प्रशस्त फ्लॅट्स उपलब्ध करून दिले आहेत. दोन वर्षाच्या कालखंडानंतर होत असलेल्या या वास्‍तू प्रदर्शनात शहरातील विविध गृहप्रकल्पांची माहिती ग्राहकांना मिळणार आहे. भविष्यातील घरांचे दर वाढण्यापूर्वी आत्ताच आपल्या घरांचे बुकिंग करणे फायद्याचे ठरणार आहे. घर घेण्याची ही योग्य वेळ असून, आपल्या स्वप्नातील घरांचे स्वप्न साकार करण्यासाठी वास्तू प्रदर्शनाला नक्की भेट द्यावी.
- सतीश आगरवाल,
ऐश्‍वर्यम हमारा (५६८४७)


प्रत्येकाला आपल्या बजेटनुसार घर घेण्याची इच्छा असते. बजेटनुसार घर घेण्याची नामी संधी सकाळ वास्तू प्रदर्शनामुळे ग्राहकांना मिळणार असून, यात कोठे अधिक सोयीसुविधा, सवलत आहे, हे सुद्धा पाहता येणार आहे. हाच विचार करीत शाळीग्राम पॅव्हेलियनने सुद्धा ग्राहकांसाठी उत्तम दर्जेदार व प्रशस्त टू बीएचके व थ्री बीएचके फ्लॅटस उपलब्ध करून दिले आहेत. सध्या बांधकाम क्षेत्रात होत असलेले बदल पाहता भविष्यात घरांच्या किंमती वाढण्याची शक्यता पहाता आपले स्वतःचे घर घेण्याची हीच योग्य वेळ आहे. गुंतवणूक व राहण्यासाठीसुद्धा योग्य पर्याय शाळीग्राम पॅव्हेलियनने घर घेवू इच्छिणांऱ्यांना दिले आहेत. प्रदर्शनात घराची बुकींग करणाऱ्यांना विशेष सवलत देण्याचे नियोजन आहे. तरी प्रदर्शनाला भेट देत आपल्या बजेटनुसार घराचे स्वप्न साकार करा.

मारूती मोरे -शालिग्राम पॅव्हेलियन (५६७५१)
----------------------------------

योग्य बजेट व दर यांची योग्य सांगड घालत सिल्व्हर ग्रुपने घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी उत्तम दर्जेदार गृहप्रकल्प योजना कार्यान्वित केल्या आहेत. ग्राहकांसाठी जुन्या दरांपेक्षी कमी किंमतीत परवडणारे घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला असून, शून्य टक्के स्टॅम्प ड्युटी, नो जीएसटी या मुळे ग्राहकांचा फायदा अधिक होणार आहे. दरवाढीची भीती न बाळगता ग्राहकांनी नक्कीच आपल्या स्वतःच्या घराचे बुकींग केले पाहिजे. शहरात नवीन उत्तम गृहप्रकल्प निर्माणाधीन असून, प्रत्येकाच्या आर्थिक बजेटनुसार घरांची उपलब्धता आहे. सकाळ वास्तू प्रदर्शनाच्या माध्यमातून एकाच छताखाली शहरातील विविध प्रकल्पांची माहिती मिळणार असून, प्रदर्शनाला नक्की भेट द्यावी.

गणेश जाधव - सिल्व्हर ग्रुप (५६८६०)
--------------------------------------------
सकाळ वास्तू प्रदर्शनाच्या माध्यमातून घर घेवू इच्छिणाऱ्यांसाठी उत्तम संधी असून, आपल्या आवडीचे घर घेण्याचे नियोजन करीत असाल तर आम्ही रावेत किवळे येथे व्हिजन ॲरिस्टो ही सर्वसोयीसुविधांनी युक्त असा गृहप्रकल्प उभारला जात असून, येथे टू बीएचके व थ्री बीएचके फ्लॅटस उपलब्ध आहेत. मोशी येथे नव्याने व्हिजन रिदम हा नाविण्यपूर्ण गृहप्रकल्प निर्माणाधीन असून, ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न असणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्राहकांना विविध गृहप्रकल्पांची माहिती एकाच ठिकाणी मिळणार असून आपल्या आवडी नुसार घरांची निवड करणे सोपे जाणार आहे. भविष्यातील घरांच्या किंमती वाढण्यापूर्वी प्रदर्शऩाला भेट देत आपल्या घराचे स्वप्न साकार करा.
नितेश पटेल- संचालक, व्हिजन क्रिएटीव्ह ग्रुप (५७०४४)

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top