चापेकर चौकाचा हा तर अपमान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चापेकर चौकाचा हा तर अपमान
चापेकर चौकाचा हा तर अपमान

चापेकर चौकाचा हा तर अपमान

sakal_logo
By

चिंचवड ः गणेशभक्त महासाधू मोरया गोसावी यांचे समाधी मंदिर, ब्रिटिश अधिकारी रँड याचा गोळ्या झाडून खून करत फासावर गेलेले चापेकर बंधू यांचे निवासस्थान अशी इतिहासात नोंद असलेली ठिकाणे चिंचवडगावात आहेत. मंदिर परिसरात दररोज शेकडो भाविकांची गर्दी असते. तर क्रांतीवीर चापेकर चौक सकाळपासून रात्री उशिरापर्यंत वाहनांच्या वर्दळीने गजबजलेला असतो...साहजिकच याकडे प्रसिध्दीलोलुपांचे लक्ष न गेले तर नवलच. येथे फलक लागला नाही तर आपण प्रसिध्द होणार नाहीच, असाच समज किरकोळातील किरकोळ व्यावयायिक ते आमदार-खासदारांचे फलक लागलेले असतात. अशा फलकांच्या गर्दीत मंदीर परिसर आणि चापेकर पुतळा दोन्ही हरवून जातो. वास्तविक दोन्ही ठिकाणे प्रेक्षणीय आहेत. मात्र, त्याचे विद्रुपीकरण झाले आहे. दर संकष्टी आणि वर्षातून एकदा होणाऱ्या संजीवन समाधी सोहळ्याला तर ‘भाविकांचे स्वागत’, ‘भाविकांना शुभेच्छा’ असे शंभरभर फलक लागतात. चापेकर चौकात तर बारा महिने फलक! याविषयी भाविक, नागरिक हळहळत असले तरी देवस्थान, स्मारक समिती पदाधिकारी यांना याची खंत नसावी. कारण ते नेहमी मौनात असतात. त्यामुळे भाविकांनीच उठाव करून महापालिकेला हे फलक एका रात्रीत जमीनदोस्त करणे भाग पाडले पाहिजे. बुधवारी केलेल्या पाहणीत मंदिर परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यावर १७ व चौकात २९ फलक आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..