
मतदार यादीचा खेळ
घरकुलमधील मतदारयादीचा घोळ कायम
चिखलीत मतदारांची नोंद दुसऱ्या प्रभागात; त्रस्त नागरिकांकडून मोहीम राबविण्याची मागणी
पिंपरी, ता. १८ ः चिखली - घरकुलमधील मतदारयादीचा खेळ अद्याप सुरू आहे. गेल्या आठ वर्षांपासून घरकुलमधील नागरिकांची नोंदणी केलेली नाही. येथील मतदारांची नोंद दुसऱ्या प्रभागात असल्याने नागरिक पुरते वैतागले आहेत. परिणामी मतदार नोंदणीची मोहीम राबविण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तयार करण्यात आलेले घरकुल याठिकाणी गेल्या आठ वर्षांपासून लोक वास्तव्याला आहेत, परंतु येथील मतदान नोंदणी जाणीवपूर्वक केली जात नाही. आजपर्यंत जवळपास वीस हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या आहे. मतदान नोंदणी केवळ ८ ते ९ हजार झाली आहे. घरकुलमधील नोंदणी करताना जाणीवपूर्वक मतदान नोंदणी केली जात नसल्याचा वारंवार दिसून येत आहे. मतदार अधिकाऱ्यांना व संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांनी येथील मतदान नोंदणी संदर्भात माहिती दिली जाते, तसेच वैयक्तिकरित्या किंवा एखादा कार्यक्रम घेऊन मतदान नोंदणी राबवली जाते, परंतु येथील मतदारांची नोंद ही दुसऱ्या प्रभागात केली जाते.
लोकांनी बऱ्याचदा मतदान नोंदणीसाठी कागदपत्रे दिली, मात्र मतदार नोंदणी होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काहींची नावे यादीत आढळत नाही. अनेक वर्ष नोंदणी करूनही दुसऱ्या मतदारसंघात नाव नोंदले गेल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी महापालिका निवडणूक विभागाने या सोसायट्यांमध्ये जनजागृती करून तेथील मतदार नोंदणीची मोहीम राबवावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
---------------
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..