गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गिऱ्हाइकांची गर्दी

खरेदीचा बंपर धमाका; सोने, कपडे, इलेक्ट्रॉनिक बाजारपेठ बहरली

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गिऱ्हाइकांची गर्दी खरेदीचा बंपर धमाका; सोने, कपडे, इलेक्ट्रॉनिक बाजारपेठ बहरली

पिंपरी, ता. ३ : साडेतीन मुहूर्तापैकी असलेल्या गुढीपाडवा सणाला दोन वर्षानंतर बाजारपेठेत गिऱ्हाइकांची चांगलीच गर्दी दिसून आला. सराफी, इलेक्ट्रॉनिकमधील विविध वस्तू, स्मार्टफोन, कपडे, घर, गाळे, दुचाकी व चारचाकी वाहन खरेदीसाठी तुफान गर्दी झाल्याचे पहावयास मिळाली. कोरोनाची अन् नोकरी व्यावसायातील मरगळ संपल्यानंतर नागरिक मोठ्या हौसेने कुटुंब व मित्रमंडळीसमवेत शॉपिंगमध्ये गुंतले होते. परिणामी, करोडो रुपयांची उलाढाल एका दिवसात सणाच्या मुहूर्तावर पिंपरी-चिंचवड शहरात झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

सराफी बाजारपेठेने एकदमच उसळी घेतल्याने गेल्या एक वर्षात सोने खरेदीकडे महिलांना पाठ दिली. मात्र, युक्रेन-रशिया युद्ध परिस्थितीत काल प्रथमच गुढीपाडव्याला खऱ्या अर्थाने सोने बाजारपेठेला झळाळी आली. लग्नाचे मुहूर्त असल्यानेही कुटुंबांनी एकत्रितपणे लग्नसराईची खरेदी केली. सोन्याची आयात टनामध्ये होत असेल तरीही, क्विंटलमध्येही सोन्याची मोड होत नसल्याचे सराफी व्यावसायिकांनी सांगितले. मात्र, दहा वर्षांपूर्वी दहा ते पंधरा हजार व त्यानंतर २० ते २५ हजार दराने सोने खरेदी केलेल्या गिऱ्हाईकांची मोडीसाठी गर्दी होत आहे. येणाऱ्या सहा महिन्यांच्या कालावधीत सोने ६० ते ६५ हजार रुपयांपर्यंत महागणार असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

नागरिकांची घरांची डिमांड प्रचंड वाढली आहे. बांधकामांच्या किमती २० टक्के वाढण्याची चिन्हे आहेत. त्याशिवाय इतर पर्याय नाही. पाडव्याच्या मुहूर्ताची आम्ही त्यासाठी वाट पाहत होतो. स्टील १०० रुपये, सिमेंटचं पोतं ४०० रुपये झाले आहे. इतर सर्व साहित्यांच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना घरांच्या किमती वाढविण्याशिवाय आता पर्याय उरला नाही.
- अनिल फरांदे, क्रेडाई पुणे मेट्रो, अध्यक्ष

विविध कंपन्यांचे सर्वाधिक कुलर जास्त विकले गेले. उन्हाळा असल्याने एसीपेक्षाही कुलरला डिमांड वाढली आहे. सात ते दहा हजार रुपयांच्या रेंजमधील कुलरला मागणी आहे. पिंपरी कॅंम्पमध्ये लाखो रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री एका दिवसांत झाली आहे.
- दिलीप मदनानी, इलेक्ट्रॉनिक मार्केट, अध्यक्ष, पिंपरी

गुढीपाडवा मुहूर्तावर माझ्या शोरुमच्या ३२ इलेक्ट्रीक दुचाकी वाहनांची विक्री झाली आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बुकिंग संपले होते. इलेक्ट्रीक वाहने ऑर्डर देण्यासाठी पुरली नाहीत. हे चित्र पूर्ण शहरात आहे. पेट्रोलचा भडका उडाल्याने इलेक्ट्रीक वाहन खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला आहे.
- रोहित पानसरे, लॉजिकॉन मोटर्स, चिंचवड

महिलांची लाइटवेट दागिन्यांना मागणी वाढली आहे. त्यामध्ये नेकलेस, मिनी गंठण, राणीहार, बांगड्या व टेंम्पल ज्वेलरीलाही मागणी आहे. सोने खरेदीवर कोणतीही ऑफर नाही. कारण, कोरोनामुळे बाजारपेठेत मंदी होती. त्यामुळे, उलाढाल मंदावली होती. मात्र, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
- करण सोनिगरा, सोनिगरा ज्वेलर्स, चिंचवड

पाडवा मुहूर्तावर सोने बाजारभाव
२२ कॅरेट : ४९ हजार
२३ कॅरेट : ५२ हजार

पिंपरी-चिंचवड शहरातील वाहन विक्री आकडेवारी -

जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल एकूण
सीएनजी ६२२ ५१७ ६७२ ७ १८१८
डिझेल १३२३ १३०१ १४३२ ८६ ४१४२
इलेक्ट्रिक ६७३ १०२० १४०१ ६७
३१६१
पेट्रोल ७१३४ ६३०० ७१०९ ६९१ २१३२४
पेट्रोल/ सीएनजी ९०७ ११५७ १४४९ ११३ ३६२६
पेट्रोल/हायब्रीड ८४ ५५ ६४ ५ २०८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com