चिंचवडगावातील वाहतुकीत बदल
पिंपरी, ता. ७ : चिंचवडगावातील चाफेकर चौक ते मोरया रुग्णालयापर्यंत रस्त्याच्या कामामुळे येथील मार्गावरील वाहतुकीत बदल केला आहे. चिंचवडगाव पीएमपीएमएल बसथांबा, मोरया रुग्णालयाकडून चाफेकर चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद असेल. या मार्गाने जाणारी वाहने सरळ न जाता पॉवर हाऊस (भोईर आळी) येथून चाफेकर चौकाकडे, तसेच इच्छितस्थळी जातील. हा बदल गुरुवारपासून (ता.७) पुढील वीस दिवसांसाठी असेल. तरी नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने केले आहे.
लिंक रोड, तसेच चिंचवडगावासह परिसरातून येणारी अनेक वाहने या मार्गाने चाफेकर चौक, चिंचवड स्टेशन आदी ठिकाणी जातात. त्यामुळे या मार्गावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. त्यातच हा मार्ग बंद झाल्याने पर्यायी मार्गावरही चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.