श्ंभर विद्याथ्यांना गुणवत्ता यादीत आणू

श्ंभर विद्याथ्यांना गुणवत्ता यादीत आणू

Published on

पिंपरी, ता. ७ ः महापालिकेच्या शाळांमध्ये पाचवी आणि आठवीचे विद्यार्थी जास्तीत जास्त शिष्यवृत्तीधारक व्हावेत, म्हणून प्राथमिक शिक्षण विभागातर्फे शिक्षकांसाठी कार्यशाळा झाली. १०५ शाळांमधील वर्ग शिक्षकांची उपस्थिती होती. दीपक रेहवरे, नीलेश जगताप, मंगला आहेर यांनी गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी, मराठी विषयाचे मार्गदर्शन केले. रोज सराव घ्यावा, पालकांना सहभागी करून घ्यावे. जादा तास घ्यावेत, अशी सूचना प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी केली. आपली मुले गुणवत्ता यादीत आणण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन उपायुक्त संदीप खोत यांनी केले. आगामी शैक्षणिक वर्षात १०० मुले गुणवत्ता यादीत आणण्याचा निर्धार शिक्षकांनी केला. या वेळी पर्यवेक्षक अनिता जोशी, रजिया खान, विषय तज्ज्ञ प्रदीप शिंदे, दयानंद शिंदे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com