मोशीतील कचरा डेपोच्या आगीची चौकशी करा : पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोशीतील कचरा डेपोच्या 
आगीची चौकशी करा : पाटील
मोशीतील कचरा डेपोच्या आगीची चौकशी करा : पाटील

मोशीतील कचरा डेपोच्या आगीची चौकशी करा : पाटील

sakal_logo
By

पिंपरी, ता. ७ : मोशी येथील कचरा डेपोला बुधवारी (ता. ६) सायंकाळी भीषण आग लागली. या आगीची चौकशी करून संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय युवक मराठा महासंघाचे अध्यक्ष उदयसिंह पाटील यांनी केली असून याबाबत आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे.

या कचरा डेपोमध्ये लाखो टन कचरा संकलित केला जातो. धुराचे लोटमुळे प्रदूषणात मोठी वाढ होत असल्याने पिंपरी-चिंचवडकरांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. महापालिका प्रशासनाची उदासीनतेमुळे कचरा डेपोला सातत्याने आग लागण्याचा प्रकार घडत आहेत. आग लागण्याचे कारण नैसर्गिक आहे, की हेतुपुरस्सर आग लावण्याचा मानव निर्मित प्रयत्न होत आहे, असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे कचरा नष्ट करण्याच्या शास्त्रोक्त पद्धतीचा वापर करण्याऐवजी आगींच्या घटनांमुळे हा कचरा आपोआपच नष्ट होत असल्याने ‘सुंठेवाचून खोकला गेला’ अशी, तर प्रशासनाची भूमिका नाही ना, अशी शंका नागरिकांकडून उपस्थित केली जात आहे.
महापालिकेने शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा खेळ मांडलेला आहे. या प्रकाराला जबाबदार असणाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी; अन्यथा या विरोधात शहरात जनआंदोलन उभे करण्यात येईल, असा इशारा उदयसिंह पाटील यांनी दिला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..