
शहरात गृहखरेदीचा सुवर्णसंधी
पिंपरी, ता. १० : ‘सकाळ’ माध्यम समूहामार्फत आयोजित ‘सकाळ वास्तू प्रदर्शन २०२२’ हे १६ व १७ एप्रिलला चिंचवड-ऑटो क्लस्टर येथे भरविले जाणार आहे. ‘स्मार्ट सिटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीत स्वतःचे घर असावे, हे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यांच्यासाठी ही एक पर्वणीच असणार आहे. अनेक नामांकित बांधकाम व्यावसायिकांचा समावेश या प्रदर्शनात आहे. प्रदर्शनाविषयी या बांधकाम व्यावसायिकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया.
‘‘सध्या घर खरेदी करणाऱ्यांसाठी उत्तम वातावरण असून सर्वत्र उत्साह आहे. भविष्यात बांधकाम साहित्य व मुंद्राक शुल्क व गृहकर्जामध्ये वाढ होण्याची शक्यता असून घरांची किंमती वाढत राहणार आहेत. सध्या ग्राहकांना परवडेल अशा दरांमध्ये घर उपलब्ध असून अधिकाधिक ग्राहकांनी ‘सकाळ वास्तू प्रदर्शना’ला भेट द्यावी. एकाच ठिकाणी विविध गृहप्रकल्पांची माहिती प्रत्यक्ष बांधकाम व्यावसायिकांव्दारे दिली जाणार आहे. त्यामुळे आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरे या प्रदर्शनात थेट मिळतील. ‘फरांदे स्पेसेस’ने सुद्धा सर्वसामान्य ग्राहकाचा विचार करीत नवीन गृहप्रकल्प देण्याचा प्रयत्न केला आहे.
- आकाश फरांदे, फरांदे स्पेसेस
फोटो Ids : PNE22S55683
-----------------
‘तनिष पार्क’ हा पिंपरी-चिंचवडमधील सर्वात कमी दर असलेला व ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला गृहप्रकल्प आहे. ‘सकाळ वास्तू प्रदर्शन’ हे ग्राहकांसाठी पर्वणी असते. वन बीएचके व टू बीएचके फ्लॅटची माहिती या प्रदर्शनातून मिळणार आहे. ग्राहकांना परवडणारे व अल्प दरातील प्लॅट ‘तनिष पार्क’ येथे उपलब्ध असून, ग्राहकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन आपल्या घराचे स्वप्न साकार करावे. उत्तम दर्जेदार बांधकाम व सोयीसुविधा यामुळे ‘तनिष्क पार्क’ हा गृहप्रकल्प ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे.
- राजेश मेहता, तनिष पार्क
फोटो आयडी : PNE22S55684
-----------------
‘सकाळ वास्तू प्रदर्शना’त दरवर्षी हजारो ग्राहक भेट देत आपल्या घराचे स्वप्न साकारत असतात. एकाच छताखाली ग्राहकांना विविध गृहप्रकल्पांची माहिती मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे ‘सकाळ वास्तू प्रदर्शन’. ‘शेवी ग्रुप’चा मोशी मध्ये उत्तम दर्जाचा गृहप्रकल्प असून, यामध्ये अनेक सोयीसुविधा देण्यात आल्या आहेत. आपले स्वतःचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी वास्तू प्रदर्शनाला भेट द्यावी. प्रदर्शनात फ्लॅट बुक करण्यासाठी विशेष सवलत देण्यात येणार आहे.
- अक्षय पंजाबी, शेवी ग्रुप
फोटो आयडी : PNE22S55685
------------------------------
औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार सध्या मोठ्या प्रमाणात होत आहे. प्रशस्त रस्ते, वीज, पाणी या सुविधांमुळे घर घेवू इच्छिणाऱ्यांचा कल सध्या शहराकडे वाढत आहे. ‘सकाळ’ आयोजित ‘सकाळ वास्तू प्रदर्शना’च्या माध्यमातून एकाच छताखाली शहरातील विविध गृहप्रकल्पांची माहिती प्रत्यक्ष भेट देऊन घेता येणार आहे. विविध ॲमेनिटीज, लॅविश फ्लॅट, ‘शालिग्राम स्काय’ व ‘शालिग्राम पॅविलिया’ या गृहप्रकल्पात ग्राहकांना मिळणार असून अधिकाधिक ग्राहकांनी या गृहप्रकल्पाला भेट द्यावी.
- योगेश चिंचवडे, शालिग्राम ग्रुप
फोटो आयडी : PNE22S55686
--------------------
‘सकाळ वास्तू’ लोगो आयडी : PNE22S5482०
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..