लोणावळ्यात रामन्मोत्सव उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोणावळ्यात रामन्मोत्सव उत्साहात
लोणावळ्यात रामन्मोत्सव उत्साहात

लोणावळ्यात रामन्मोत्सव उत्साहात

sakal_logo
By

लोणावळा, ता. १०ः लोणावळा परिसरात रामनामाचा जयघोष करीत रामजन्म सोहळा भक्तीमय तसेच उत्साहपूर्ण वातावरणात झाला. गवळीवाडा येथे नवमी उत्सवामुळे श्रीराम मंदिरात दर्शनासाठी लोणावळा परिसरातील भाविकांनी सकाळपासून मोठी गर्दी केली होती. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. गुढीपाडव्यापासून येथील श्रीराम मंदिरात श्रीराम रक्षापठण, रामनामाचा जप, श्रीराम कथावाचन सुरू आहे. या कार्यक्रमाची रविवारी सांगता झाली. दुपारी प्रभू रामचंद्राचा जन्मसोहळा झाला. श्रीराम मारुती सेवाभावी ट्रस्ट, श्रीराम क्रीडा मंडळ, नवमी भजनी मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गवळीवाडा येथील ग्रामस्थांनी उत्साहपूर्ण वातावरणात श्रींची पालखी सोहळा व छबिन्याची वाजत गाजत मिरवणूक काढली. कुस्त्यांचा आखाडा, महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. भांगरवाडी येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीराम मंदिरास शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्‍वभूमीवर मंदिरात श्रीराम जन्मसोहळा मंगळवारी भक्तीमय वातावरणात झाला. ‘श्री’ना अभिषेक, प्रवचन, गंगालहरी वाचन व प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

छायाचित्रः lon10p14/15

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top