गावरान बोरांचे झाडे नामशेषच्या मार्गावर उत्पादनात घट ः वाढते यांत्रिकीकरण व जमिनीच्या सपाटीकरणाचा फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गावरान बोरांचे झाडे नामशेषच्या मार्गावर
उत्पादनात घट ः वाढते यांत्रिकीकरण व जमिनीच्या सपाटीकरणाचा फटका
गावरान बोरांचे झाडे नामशेषच्या मार्गावर उत्पादनात घट ः वाढते यांत्रिकीकरण व जमिनीच्या सपाटीकरणाचा फटका

गावरान बोरांचे झाडे नामशेषच्या मार्गावर उत्पादनात घट ः वाढते यांत्रिकीकरण व जमिनीच्या सपाटीकरणाचा फटका

sakal_logo
By

ऊर्से, ता. २१ : गेल्या वीस वर्षात झालेल्या भरमसाट वृक्षतोडीमुळे व जमीन सपाटीकरणामुळे मावळ तालुक्यातील तिन्ही पट्ट्यातील पडीक, कोरडवाहू क्षेत्रात वाढणाऱ्या गावरान बोरांची झाडे नामशेष होऊ लागली आहेत. परिणामी बोरांच्या उत्पादनात घट होऊन, स्थानिक बाजारपेठेत गावरान बोरे ४० रुपये किलोने विकली जात आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात गावरान बोरांच्या झाडांचे संवर्धन होणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
वृक्षतोडीमुळे मावळच्या पट्ट्यात पडीक, कोरडवाहू क्षेत्रात वाढणाऱ्या गावरान बोरांची झाडे नामशेष होऊ लागली आहेत. परिणामी बोरांच्या उत्पादनात घट होऊन, स्थानिक बाजारपेठेत गावरान बोरे ४० ते ५० रुपये किलोने विकली जात आहेत. त्यामुळे वर्षातून एकदाच मिळणाऱ्या आणि तोंडाला पाणी आणणाऱ्या गावरान रानमेव्याच्या चवीला पारखे होण्याची वेळ आली आहे. कधीकाळी रस्त्यावरून गावातील भागात जाताना दोन्ही बाजूकडे बोरांच्या झाडांची रांग दिसायची. आज कुठेतरी एखादे झाडे दिसत आहे.

तालुक्यातील इंद्रायणी व पवना आदी नद्यांचा सुपीक परिसर वगळता अन्य भागांत काही वर्षांपूर्वी केवळ कोरडवाहू शेती केली जात होती. सिंचनाच्या सोयीअभावी हजारो हेक्टर क्षेत्र पडीक होते. परंतु गेल्या काही वर्षांत सिंचनासाठीच्या विहिरी, इलेक्ट्रिक मोटारी आणि यांत्रिकीकरणाच्या सोयी झाल्यामुळे व जमिनीचे सपाटीकरण व वाढते नागरीकरण, प्लॉटिंग यामुळे व कोरडवाहू शेती करण्याच्या नादात माळरानावर, बांधावर तोऱ्यात मिरवणाऱ्या बोरी-बाभळींची पुरतीच गच्छंती झाली आहे. जमिनीचे सपाटीकरण करण्याची सुरवातच बोरी, बाभळींच्या कत्तलीपासून होत असून, ही झाडे मुळापासून उखडून काढली जात आहेत. गेल्या  पंधरा ते वीस वर्षांच्या कालखंडात तालुक्यातील गावरान बोरांची झाडे नामशेष होत चालली असून, त्यामुळेच वर्षातून एकदाच मिळणाऱ्या रानमेव्याला मुकण्याची वेळ आली आहे. पावसाळा संपून हिवाळा लागताच पिकून लाल, पिवळी होणाऱ्या बोरांच्या झाडांचे दर्शन दुर्लभ झाले आहे. माळरानांनाही किमती आल्याने त्यावर उभ्या
असणा-या बोरी आता मुळासकट भुईसपाट झाल्या आहेत.

गावेगावी, लांबलांबपर्यंत सर्वत्र बागायती शेती होऊ घातल्यामुळे काटेरी झुडपात मोडणाऱ्या बोरीची झाडे दुर्मिळ होत चालली आहेत. सध्या डोंगर, जंगल परिसरात तग धरून असलेल्या झाडांवरच निर्भर राहावे लागत असून, उत्पादन कमी झाल्यामुळे वाढत्या मागणीसोबत गावरान बोरांच्या किमतीही वाढल्या आहेत. पशु- पक्षी यांच्यासाठी रान बोरांची झाडे म्हणजे वर्षातून जवळपास महिनाभर मिळणारे खाद्य. माळराने, जंगलभाग व डोंगर भागात पक्षांसाठी बोरांची झाडे अतिशय महत्त्वाची आहेत. या पशू- पक्षी यांच्यासाठी आज या झाडांचे संवर्धन गरजेचे झाले आहे.

अशी आहे सद्यःस्थिती ः
• संवर्धन होणे गरजेचे
• शासकीय स्तरावर जनजागरण गरजेचे
• इतर झाडाप्रमाणे गावरान बोरांच्या वृक्षतोडीस बंदी आणणे
• रानमेवा असणाऱ्या इतर वृक्षांचे संवर्धन व्हावे


‘‘गावरान बोरांच्या झाडांचे संवर्धन करण्यासाठी सामाजिक संस्था, ग्रामस्थ यांनी गावपातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे. या झाडांवरील फळावर पक्षी आपले उदरनिर्वाह करतात. भविष्यात रानबोरांची चव मुलांना मिळाली पाहिजे.
रेखा वाघमारे, वनरक्षक, बेबडओहळ


फोटो ः 02222