गुन्हे शाखाच्या उल्लेखनिय कामगिरीकरिता पोलिसांचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हे शाखाच्या उल्लेखनिय 
कामगिरीकरिता पोलिसांचा गौरव
गुन्हे शाखाच्या उल्लेखनिय कामगिरीकरिता पोलिसांचा गौरव

गुन्हे शाखाच्या उल्लेखनिय कामगिरीकरिता पोलिसांचा गौरव

sakal_logo
By

ऊर्से, ता. ७ : कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी १९ जानेवारी ते ३ फेब्रुवारी दरम्यान विशेष मोहीम राबविली. मोहिमेत ज्या पोलिस कर्मचाऱ्यांनी, गुन्हे शाखांनी चांगली कामगिरी केली, त्यांचा पोलिस आयुक्त चौबे यांनी प्रशिस्तिपत्रक देवून गौरव केला. यामध्ये मावळ तालुक्यातील शिरगाव पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक वनिता धुमाळ, पोलिस नाईक समिर घाडगे, पोलिस अंमलदार समाधान फडतरे, पोलिस अंमलदार दिलीप राठोड यांना उल्लेखणीय कामगिरी केल्याबद्‍दल गौरविण्यात आले. शहरात व ग्रामीण भागात येणारा अवैध शस्त्रसाठा जप्त करण्यासाठी शस्त्रविरोधी मोहिम राबविण्यात आली होती. यामध्ये एकूण ४८ पिस्तूलासह २५३ शस्त्रे जप्त करण्यात आली. मावळ तालुक्यात
३ पिस्तुल ८ जिवंत काडतुस व ८ कोयते अशी शस्त्रे जप्त केली. यामध्ये एकुण पाच आरोपींना अटक करण्यात आली.

दिवसेंदिवस ग्रामीण भागातही गुन्हेगारींचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये तरूण व अल्पवयीन मुलांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग वाढत आहे. पवन मावळातील सोमाटणे, चांदखेड, साळुंब्रे व ऊर्से या नव्याने विकसित होणाऱ्या गावातून पाच आरोपींना अटक करण्यात आली. यामध्ये एक अल्पवयीन आहे.