चांदखेड व शिवणेतील रस्त्याचे भूमिपूजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चांदखेड व शिवणेतील
रस्त्याचे भूमिपूजन
चांदखेड व शिवणेतील रस्त्याचे भूमिपूजन

चांदखेड व शिवणेतील रस्त्याचे भूमिपूजन

sakal_logo
By

ऊर्से ,ता. ५ ः खासदार श्रीरंग बारणे यांच्या खासदार स्थानिक विकास निधीतून मावळ तालुक्यातील चांदखेड व शिवणे गावातील कॉंक्रीट रस्त्याचे भूमिपूजन नुकतेच खासदार बारणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बारणे म्हणाले, ‘‘मावळमध्ये विविध ग्रामपंचायतीच्या मागणीतून अनेक विकास कामे केंद्र आणि राज्यशासनच्या माध्यमातून पूर्ण केली जातील. यावेळी विकासासाठी राजकीय जोडे बाजूला ठेवून, मावळच्या विकासासाठी आपण सतत कार्यरत राहू.’’
या प्रसंगी जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, उपजिल्हा प्रमुख शरद हुलावळे, तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, जिल्हा संघटक अंकुश देशमुख, भाजप जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, रमेश गायकवाड, सरपंच मीना माळी, सरपंच अजित चौधरी, दत्ता केदारी, विशाल हुलावळे, दत्ताभाऊ माळी, श्रीकांत जाधव, रामभाऊ सावंत, महेंद्र वाळूंज, नितीन देशमुख, खंडू शेलार व ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.


फोटो ः 02301