
बेबडओहोळ-पिंपळखुंटेत तीस महिलांचा सन्मान
ऊर्से : बेबडओहोळ-पिंपळखुंटे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील राजकीय, सामाजिक, शिक्षण, आरोग्य अशा विविध विभागात कार्य केलेल्या ३० महिलांचा कर्तबगार म्हणून विशेष सन्मान करून महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कमल रोहिदास गराडे यांच्या पुढाकाराने पिंपळखुटे येथील श्री हनुमान मंदिरात झालेल्या या सन्मान सोहळ्यास रोटरी क्लब ऑफ निगडीच्या कमलजीत कौर उपस्थित होत्या.
कर्तबगार सन्मानाच्या माजी सरपंच सुशीला जाधव, अर्चना घारे, सारिका घारे, सुषमा गायकवाड, सविता सप्रे, माजी उपसरपंच सुनीता घारे, नम्रता घारे, मनीषा घारे, कविता ढमाले, संध्या शिंदे, लताबाई गायकवाड, माजी ग्रामपंचायत सदस्या शोभा गायकवाड, मालाबाई गायकवाड, सुजाता गराडे, नंदा गराडे, कल्पना गराडे, पोलिस पाटील दुर्गा घारे, कात्रज दूध डेअरीच्या मॅनेजिंग डायरेक्टर माधुरी ढमाले, मुख्याध्यापिका नीलम साळुंखे, शिक्षिका अर्चना भरगंडे, कल्पना देशमुख, सुनीता शेळके, अंगणवाडी सेविका जयश्री मारणे, आशा घारे, श्यामल गराडे, नयना घारे, उज्वला पायगुडे, निमा हिंगे, स्वयंसेविका सुजाता घारे, सुषमा थोरवे, वैशाली गायकवाड या महिलांचा सन्मान करण्यात आला.