जि.प. शाळा, मळवंडी ढोरे

जि.प. शाळा, मळवंडी ढोरे
Published on

जि.प. शाळा, मळवंडी ढोरे

ऊर्से, ता.१९ : पवन मावळातील मळवंडी ढोरे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. बालसभेचा अध्यक्ष उत्कर्ष ढोरे, सरपंच गोरख ढोरे, उपसरपंच प्रकाश ढोरे यांच्या हस्ते श्री शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थिनींनी शिवरायांचा पाळणा गायला. तसेच दूर्वा ढोरे हिने ‘प्रतापगडावरील पराक्रम’ या प्रसंगावर आधारित पोवाडा सादर केला. विद्यार्थ्यांनी शिवरायांबद्दलची महती सांगणारी भाषणे आणि गाण्यांवर नृत्य सादरीकरण केले.

सातवीतील विद्यार्थिनी सृष्टी ढोरे हिने सूत्रसंचालन, तर सार्थक भाऊ ढोरे याने आभार मानले. कार्यक्रमासाठी माजी सरपंच भगवान कांबळे, चंद्रकांत ढोरे, रेणुका जाधव, तानाजी जाधव, उत्तम ढोरे, सोनाली गायकवाड, संध्या ढोरे आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक राजू भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली धीरजकुमार जानराव, सरोजा अंबुलगे व पूजा राऊत यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

फोटो क्रमांक: BBD25B03178

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com