आढले खुर्द शाळेला डिजिटल इंटरॲक्टिव्ह बोर्ड भेट

आढले खुर्द  शाळेला डिजिटल इंटरॲक्टिव्ह बोर्ड भेट
Published on

ऊर्से,ता.१८ :  आढले खुर्द येथील शाळेला डिजिटल इंटरॲक्टिव्ह बोर्ड भेट देण्यात आला. एचएनआय जेबीएससी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व थिंक शार्प फाउंडेशनमार्फत ही मदत करण्यात आली. या स्मार्ट बोर्डमध्ये आठवीपर्यंतचा अभ्यासक्रम, स्वाध्यायचा समावेश आहे. यासह वाचनासाठी पूरक लायब्ररी किटही देण्यात आले आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन संस्थेचे स्टीव्हन ब्रेडफोर्ड, कॉपर इव्हन्स, केली मॅक्रीफ, शिक्षण विस्तार अधिकारी शोभा वहिले यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सागर गलतगी, विक्रांत बजाज, शंकर हसमी, महेश देवकर, सोमनाथ पोळ, थिंक शार्प फाउंडेशनचे प्रमुख संतोष फड उपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज, केंद्रप्रमुख विजय मारणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. यावेळी सरपंच नंदा भालेसेन, उपसरपंच पप्पू चांदेकर, सोनल जगदाळे, दत्तोबा चांदेकर उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक राजू लोंढे यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मुख्याध्यापिका पौर्णिमा पिसाळ, सूत्रसंचालन स्मिता सावंत, गहिनीनाथ गायकवाड, महेश कदम, योगेश भोईर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com