इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन
ऊर्से, ता. १५ : इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये ‘नेक्स्टजेन टेक्नोलॉजी अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर अ सस्टेनेबल फ्यूचर’ या विषयावर १२ व १३ एप्रिलला पहिले आंतरराष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन परंदवडी येथे करण्यात आले. या परिषदेसाठी एकूण ३४५ संशोधन प्रबंध प्राप्त झाले होते, त्यापैकी ११६ संशोधन प्रबंधांचे सादरीकरण करण्यात आले. हे सादरीकरण १६ समांतर सत्रांमध्ये, हायब्रीड पद्धतीने पार पडले. यामध्ये देश-विदेशातील तज्ज्ञ, संशोधक, उद्योगतज्ज्ञ व विद्यार्थी सहभागी झाले होते. या परिषदेचे शास्त्रीय महत्त्व तीन प्रमुख कीनोट व्याख्यानांमधून अधोरेखित झाले. या व्याख्यानांसाठी प्रा. डाटो शामला सुब्रमणियम (युनिव्हर्सिटी पुत्रा मलेशिया), गजेंद्रन रविंद्रन (कॉर्पोरेट उपाध्यक्ष कृष्णकुमार सुंदरम व कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी) केइसोकू इंजिनिअरिंग सिस्टम्स, टोकियो, जपान आदी प्रवक्ते होते. या परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य नीलेश उके, पूर्णा शंकर, सौमित्र दास आणि संपूर्ण आयसीईएम संघ यांनी परिश्रम घेतले. ही परिषद संशोधन आंतरराष्ट्रीय सहयोग व शाश्वत तंत्रज्ञानाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

