

ऊर्से, ता. १६ : खरीप हंगाम चालू झाल्याने आता शेतकऱ्यांच्या शेतावर मशागतीला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर मावळ तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी वडगाव व मौजे नानोलीतर्फे चाकण, वारंगवाडी येथे सभा घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
सध्या मावळ तालुक्यात गावोगावी भात पीक पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रिया करणे व रोपवाटिका गादी वाफ्यावर तयार करणे, सोयाबीन बिजप्रक्रिया, चारसूत्री लागवड, फळबाग लागवड संदर्भात मोहीम राबविली जात आहे. नानोलीतर्फे चाकण येथे कृषी विभागामार्फत शेतकऱ्यासाठी खरीप हंगाम सभा घेण्यात आली. सभेमध्ये शेतकऱ्यांना सहाय्यक कृषी अधिकारी प्रियांका पाटील यांनी घरगुती भात बियाण्यास तीन टक्के मिठाच्या द्रावणाची बिजप्रक्रिया, सोयाबीन बीजप्रक्रिया रासायनिक, जैविक बीजप्रक्रियाबाबत मार्गदर्शन केले.
तालुका कृषी अधिकारी मारुती साळे यांनी चारसूत्री लागवड, फळबाग लागवड, भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, कृषी यांत्रिकीकरण महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करणे, कृषी विभागाच्या योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
मंडळ कृषी अधिकारी वडगाव राजाभाऊ गायकवाड यांनी गादीवाफे रोपवाटिका करताना, गादी वाफे तयार करताना तळाशी चार फूट व वाफ्यावर तीन फूट रुंदीचे आणि ८ ते १० सेंटी मीटर उंचीचे व क्षेत्रानुसार लांबीचे बनवावेत. एक एकर भात लागवडीसाठी चार गुंठ्यांची रोपवाटिका पुरेशी होते. भाताच्या तुसाची राख रोपवाटिका तयार करताना मातीत मिसळली तर रोपांना सिलिकॉन उपयुक्त अन्नद्रव्य मिळते व रोपे निरोगी जोमदार येतात.
तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या दौऱ्याच्या वेळी सहाय्यक कृषी अधिकारी प्रियांका पाटील, सरपंच स्वप्नील शिंदे, प्रगतशील शेतकरी भगवान मराठे, संभाजी मराठे, सुलभा कोंडे, शशिकला मराठे, रामचंद्र जगताप, पोलिस पाटील, महेश शिंदे आदी उपस्थित होते.
वारंगवाडी : भात पीक पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रिया कशी करावी याबाबत प्रात्यक्षिक दाखवताना कृषी अधिकारी व शेतकरी.
फोटो क्रमांक: BBD25B03241,42
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.