पर्यटकांना खुणावतोय थुगावचा धबधबा

पर्यटकांना खुणावतोय थुगावचा धबधबा

Published on

उर्से, ता. ६ : सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मावळ तालुक्यातील निसर्गसौंदर्य खुलले आहेत. धबधब्यांमुळे डोळ्यांचे पारणे फिटते आहे. पवना नदीवर थुगाव येथे असलेला धबधबा निसर्ग प्रेमींसाठी आकर्षण ठरत आहे.
थुगाव पुलालगत असलेला धबधबा मान्सूनचे आगमन होताच प्रवाहित होण्यास सुरूवात होते. तो पाहण्यासाठी पुणे, मुंबई या शहरांसह व इतर जिल्ह्यांतून पर्यटक येतात. वेगाने वाहत येणाऱ्या पाण्याचा खळखळात मन प्रसन्न करतो. समोरील डोंगर, हिरवेगार दृश्य आणि शेती पर्यटकांना भुरळ घालत आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या धबधब्याकडे लक्ष देत परिसराची सुधारणा केली, तर हे पर्यटनस्थळ विकसित होऊ शकते. तसेच रोजगार निर्मितीदेखील होईल, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सुरक्षा सुविधेची आवश्यकता
पावसाळा सुरू होताच पर्यटक व निसर्गप्रेमी हा धबधबा पाहण्यासाठी दरवर्षीच येत असतात. परंतु येथे सुरक्षेच्या दृष्टीने कुठल्याही प्रकारची सुविधा नाही. त्यामुळे पर्यटक दुरूनच धबधब्याचा आनंद घेतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com