दिवडमधील शाळेत 
नवीन वर्गखोल्यांचे उद्‍घाटन

दिवडमधील शाळेत नवीन वर्गखोल्यांचे उद्‍घाटन

Published on

उर्से, ता. ११ : दिवड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चार नवीन वर्गखोल्यांचे उद्‍घाटन नुकतेच करण्यात आले. हे बांधकाम हिंजवडी येथील डेना इंडिया टेक्निकल सेंटर या कंपनीच्या सीएसआर निधीतून करण्यात आले आहे.
या वर्गखोल्यांबरोबर स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, सुमारे ८० लाख रुपयांचा खर्च कंपनीने केला आहे. उद्‍घाटन कार्यक्रमात गटविकास अधिकारी के. के. प्रधान, गटशिक्षणाधिकारी शिल्पा रोडगे, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रघू मुत्तिगे, मॅनेजर सुशील दरक, हेमांग रावल आणि इतर मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कंपनीकडून पुढेही सहकार्य केले जाईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.
कार्यक्रमात वृक्षारोपण आणि सर्वांसाठी अल्पोपहाराचीही व्यवस्था करण्यात आली होती. सामाजिक कार्यकर्ते मनोज येवले आणि अमोल महाराज सावळे यांनी शाळेसाठी मोफत सीसीटीव्ही बसवले. कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी केले. कंपनीकडून सहकार्य मिळवून दिल्याबद्दल समिती सदस्य योगेश सावळे यांचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक जयवंत पवार यांनी सूत्रसंचालन केले. आभार शिक्षण विस्तार अधिकारी संदीप काळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्रप्रमुख बाळासाहेब घारे, राहुल लोंढे, दत्तात्रेय बनकर, सोनाली नलावडे, शोभा भोते यांनी केले.

दिवड : येथील नवीन इमारतीचे ऊद्‍घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व कंपनीचे पदाधिकारी, ग्रामस्थ व शाळेतील मुले.

फोटो क्रमांक : BBD25B03447

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com