मावळ बुद्धिबळ स्पर्धेत उर्से शाळेच्या तिवारीचे यश
उर्से, ता. २९ : यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवांतर्गत तळेगाव दाभाडे येथे आयोजित तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उर्से येथील विद्यार्थी कृष्णा आशिष तिवारी याने मोठ्या गटात प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले.
बुद्धिबळाच्या पटावर उत्कृष्ट एकाग्रता, अचूक गणिती विचारसरणी आणि संयम यांचा प्रभावी संगम साधत कृष्णाने सर्व प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. मावळ तालुक्यातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांच्या सहभागाने ही स्पर्धा उत्साहात पार पडली. सुरुवातीपासूनच दमदार खेळाचे प्रदर्शन करत कृष्णाने निर्णायक फेऱ्यांमध्ये कौशल्यपूर्ण चाली, प्रभावी रणनीती आणि संयमी बचावाच्या जोरावर आघाडी घेतली. अंतिम सामन्यातही उत्कृष्ट खेळ करत त्याने प्रथम क्रमांकावर आपले नाव कोरले.
कृष्णाच्या या यशामुळे शाळा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग व पालकांनी त्याचे अभिनंदन केले असून, भविष्यात तो जिल्हास्तरावरही यश संपादन करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. बुद्धिबळातील त्याची प्रगती शिस्त, चिकाटी आणि कठोर परिश्रमाचे फलित असल्याचे सर्वांनी गौरविले. या क्रीडा महोत्सवात शाळेने इतर खेळांतही यश मिळवले असून, खो-खो स्पर्धेत द्वितीय तर लेझीम स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला आहे. गटशिक्षणाधिकारी शिल्पा रोडगे, विस्ताराधिकारी सुदाम वाळुंज, संदीप काळे, केंद्रप्रमुख सविता क्षिरसागर, सरपंच भारती गावडे, कविता राऊत, संदीप कारके, अश्विनी कारके, मुख्याध्यापक बाळासाहेब जाधव तसेच सर्व शिक्षकांनी कृष्णाला जिल्हा पातळीवरील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
कृष्णा तिवारी
BBD25B03511
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

