

ऊर्से, ता.१२ : केकेनाग कंपनीजवळील ओढ्यावर असणाऱ्या पुलाच्या दोन्ही बाजुला पडलेला कचरा, माती मागील पाच सहा वर्षांपासून उचलला न गेल्याने परिसर अस्वच्छ झाला असून अपघाताचा धोका देखील वाढला आहे. त्यामुळे येथील माती राडारोडा उचलण्याची मागणी येथील स्थानिक नागरिक करत आहेत.
सात दिवसापुर्वी या ठिकाणी आंब्याचे झाड पडल्याने काही काळ वाहतुक विस्कळीत झाली. मात्र कोणतीही हानी झाली नाही. दुसऱ्या दिवशी हे पडलेले झाड बाजुला हटविण्यात आले. परंतु रस्त्याच्या कडेला पडलेला राडारोडा अद्याप न ऊचलल्याने या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. या मुख्य ओढ्यात पुलावरून दिवसरात्र वाहतुक सुरू असते. येथे मोठे वळण असल्याने वाहन चालकांना समोरील वाहने दिसत नाही. तीव्र ऊतार असल्याने वाहन थेट पुलाच्या कठड्याजवळून जाते. रात्रीच्या वेळी अंधारात धोका अधिकच वाढतो. मागील पाच-सहा वर्षापासुन या पुलावरील वाढलेले गवत, बाजुला साचलेली माती, राडारोडा हटविण्यासाठी प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे या परिसरातील राडारोडा त्वरित काढण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.