उर्से येथे चुलत भावाचा खून करून आरोपी फरारी

उर्से येथे चुलत भावाचा खून करून आरोपी फरारी

Published on

उर्से, ता.१३ : किरेकोळ वादातून चुलत भावाचा हत्याराने वार करून खून करण्यात आला. ही घटना उर्से गावातील आंबेवाडी येथे बुधवारी (ता.१३) रात्री घडली. या प्रकरणी शिरगाव परंदवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकेश निषाद (वय ३८,मूळ रा. रौंदा, ता. धमधा, जि. दुर्ग, छत्तीसगड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांचा भाऊ यशवंत निषाद (वय ३०, व्यवसाय मजुरी) यांनी फिर्याद दिली आहे. तर, आरोपी डीकेश निषाद (वय अंदाजे २७, मूळ रा. छत्तीसगड) हा फरारी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार (ता.१२) रात्री उर्से येथील नारायण कारके यांच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत ही घटना घडली. डीकेश याने किरकोळ कारणावरून मद्यधुंद अवस्थेत लोकेश याच्याशी वाद घालून मानेवर धारदार हत्याराने वार केला. यात लोकेश यांचा जागीच मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com