पुणे नाशिक महामार्गालगत होतोय वॉकिंग ट्रॅक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे नाशिक महामार्गालगत होतोय वॉकिंग ट्रॅक
पुणे नाशिक महामार्गालगत होतोय वॉकिंग ट्रॅक

पुणे नाशिक महामार्गालगत होतोय वॉकिंग ट्रॅक

sakal_logo
By

भोसरी, ता. १९ ः महापालिकेच्या वतीने नाशिक फाटा ते लांडेवाडी चौकापर्यंत सहा मीटर रुंद व एक हजार दोनशे मीटर लांबीच्या वॉकिंग ट्रॅकचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांची चांगली सोय होणार आहे. या ट्रॅकमुळे महामार्गही स्वच्छ राखण्यास मदत होणार आहे.

सद्यस्थिती
- पुणे नाशिक महामार्गाच्या दोन्ही बाजूला व्यावसायिकांद्वारे बांधकामातील राडारोडा, विक्रेत्यांद्वारे टाकाऊ माल, काही कंपन्याद्वारे रसायनमिश्रीत धोकादायक टाकाऊ पदार्थ टाकले जातात
- काही अज्ञाताद्वारे तर ट्रॅकमधून कचरा आणून रस्त्याच्याकडेला टाकण्याचा प्रकार होतात
- कचऱ्याच्या ट्रकला अडथळा करण्यासाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूला चर खोदण्यात आले आहे
- महामार्गाचे विद्रुपीकरण


असा असेल ट्रॅक
- वॉकिंग ट्रॅक मुरुम, दगड, माती यांचा उपयोग करून तयार करण्यात येतोय
- नैसगिक पद्धतीने तयार करण्यात येत असल्याने नागरिकांना आपले आरोग्य राखण्यासाठी होणार उपयोग
- ट्रॅकची रुंदी सहा मीटर तर लांबी एक हजार दोनशे मीटर असणार
- पुना स्कूलजवळील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय भिंतीलगतच्या महामार्गालगतच्या भागाचे लांडेवाडीतील ऐतिहासिक प्रवेशद्वारापर्यंत सपाटीकरण
- वॉकिंग ट्रॅक उभारल्यानंतर या रस्त्यावर नागरिकांची वर्दळ सुरू झाल्यास रस्त्याच्या कडेला कचरा टाकणाऱ्यांवर बसणार आळा
- ट्रॅकचे काम अंतिम टप्प्यात सुरू

याकडेही लक्ष द्या
- हा वॉकिंग ट्रॅक नैसर्गिक पद्धतीने उभारण्यात येत असला तरी ट्रॅकमध्ये येणारे अडथळे दूर करण्याचा महापालिकेला विसर
- भोसरी पोलिस ठाण्याजवळ दुर्घटनेतील टेम्पो ट्रॅकच्या बाजूला न काढता त्याच्यावरच माती टाकून तो अर्धा वाकिंग ट्रॅकमध्ये बुजवला गेला
- अंडी उबवणी केंद्राजवळ वॉकिंग ट्रॅकमध्ये येणारे भंगाराचे दुकानाचे अतिक्रमणही काढण्यात आलेले नाही
- ट्रॅकवरून पायी चालणाऱ्या नागरिकांना याचा अडथळा निर्माण होऊ शकतो