
भोसरीच्या क्रिकेट संघाकडून आझम कॅम्पस संघाचा पराभव
भोसरी, ता. २४ : पुणे जिल्हा क्रिकेट संघटना आयोजित कै. सदू शिंदे लीग क्रिकेट स्पर्धा पुण्यातील आझम कॅम्पस येथील मैदानावर झाली. भोसरीतील आदिनाथ क्रिकेट क्लबने आझम कॅम्पस संघाचा सात गडी राखून पराभव केला. नाणेफेक जिंकून आझम कॅम्पस संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली. आदिनाथ संघापुढे आझम संघ ९१ धावात बाद झाला. आझम संघाकडून खलिल इनामदार याने सर्वाधिक २१ धावा केल्या. आदिनाथ संघाकडून श्रीयश जगदाळे, सुधीर परांजपे, विजय जगदाळे यांनी उत्तम कामगिरी केली. ९२ धावांचा पाठलाग करताना आदिनाथ संघाकडून सर्वेश भट्टड यांनी ३१, तर विक्रमादित्य गजभार याने नाबाद २९ धावा पटकावल्या. आदिनाथ संघाने १४ व्या षटकात सामना जिंकला. उत्कृष्ट गोलंदाजी करीत चार गडी टिपणाऱ्या श्रीयश जगदाळे याला सामन्याचा मानकरी म्हणून घोषित करण्यात आले.
आझम कॅम्पस ः ३७.१ षटकात सर्वबाद ९१(खलिल इनामदार २१, सलिक पोटवेघर १४,
श्रीयश जगदाळे ४/१९, सुधीर परांजपे ३/९, विजय जगदाळे २/१७
आदिनाथ क्रिकेट क्लब ः १३.४ षटकात ९२
(सर्वेश भट्टड ३१, विक्रमादित्य गजभर नाबाद २९)
फोटो ः 00884