Fri, Sept 22, 2023

सिंगापूरात शिवराज्याभिषेक दिन साजरा
सिंगापूरात शिवराज्याभिषेक दिन साजरा
Published on : 6 June 2023, 11:41 am
भोसरी, ता. ६ ः छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५०वा राज्याभिषेक दिन भोसरी, पुण्यातील तरुण-तरुणींनी सिंगापूर येथे साजरा केला.
या वेळी सिंगापूर येथील पर्यटन स्थळ युनिव्हर्सल ग्लोब या ठिकाणी तरुण-तरुणींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मानवंदना दिली. ‘जय भवानी, जय शिवराय’ तसेच ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा जयघोषात शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात सिंगापूरमधील नागरिकांसह पर्यटकही सहभागी झाले होते. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासावर प्रकाश टाकण्यात आला. या सोहळ्यात स्वप्नील लांडगे, सूरज लांडगे, सुधीर लांडे, योगेश लांडे, मयूर गंगावणे, गणेश काकडे, स्वप्नील येळवंडे, दर्शन डौले आदींसह शिवभक्त सहभागी झाले होते.