श्री वाघेश्वर महाराज मंदिराच्या कलशारोहण दिनानिमित्त कार्यक्रम

श्री वाघेश्वर महाराज मंदिराच्या 
कलशारोहण दिनानिमित्त कार्यक्रम
Published on

भोसरी, ता. ३ ः चऱ्होलीचे ग्रामदैवत श्री वाघेश्वर महाराज मंदिराच्या पाचव्या कलशारोहण वर्धापनदिनानिमित्त कीर्तन महोत्सव, अखंड हरीनाम सप्ताहासह भजन, जागर, काकड आरती, शिवलीलामृत ग्रंथ पारायण, महापूजा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
२८ फेब्रुवारी ते ६ मार्चपर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात ज्ञानेश्वर महाराज दौंडकर, लक्ष्मण महाराज देवकर, संग्रामबापू भंडारे आळंदीकर, चैतन्य महाराज वाडेकर, माउली महाराज कोठुळे यांनी कीर्तन केले. श्रीराम, श्री संत सावता माळी, श्री हनुमान, श्री पद्मावती, श्री भैरवनाथ आदी भजनी मंडळांनी जागर केला. २७ महिला भजनी मंडळांनी भजन केले. २८ फेब्रुवारीपासून भाविकांना महाप्रसादाचेही वाटप करण्यात येत आहे.
या वेळी सोहळ्यानिमित्त वीणा पूजन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. तुकाराम महाराज ताजणे, प्रसाद महाराज माटे, सतीश महाराज काळजे, मुकुंद महाराज चौधरी, ज्ञानेश्वर महाराज गवळी, योगेश महाराज खानजोडे, नंदाराम जोरे, अशोक कोतवाल आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाघेश्वर स्वकाम सेवा मंडळाचे अध्यक्ष काळुराम पठारे, पंढरीनाथ पठारे, दिलीप काळजे, जगन्नाथ काळजे, दिलीप कोतवाल, दत्तात्रेय बुर्डे, अंबरनाथ बुर्डे, दत्ता फुले, पंडितराव तापकीर, सुनील पठारे, लक्ष्मण तापकीर आदींसह चऱ्होली ग्रामस्थ परीश्रम करत आहेत.

बुधवारी काल्याचे कीर्तन
सोमवारी (ता. ४) प्रकाश महाराज जवंजाळ तर मंगळवारी (ता. ५) समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तन होणार आहे. बुधवारी (ता. ६) पांडुरंग महाराज घुले यांचे सकाळी दहा ते दुपारी बारा दरम्यान काल्याचे कीर्तन होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com