कामगार दिनानिमित्त भोसरीत
रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिर

कामगार दिनानिमित्त भोसरीत रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिर

भोसरी, ता. २ ः महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त कै. दामुशेठ गव्हाणे मित्र मंडळाद्वारे भोसरीतील पीसीएमसी चौकात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात दोनशे पंधरा नागरिकांनी रक्तदान केले. मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य, रक्त, नेत्र, दंत तपासणी शिबिरास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना जेवणाचे डबे वाटण्यात आले.
आमदार महेश लांडगे, राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार गटाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे, अॅड. नितीन लांडगे, राजेंद्र लांडगे, सचिन लांडगे, बाळासाहेब गव्हाणे, पंडित गवळी, गोपीकृष्ण धावडे आदींनी शुभेच्छा दिल्या. विजय लांडे, निवृत्ती शिंदे, किशोर गव्हाणे, सम्राट फुगे, दत्ता गव्हाणे, प्रशिक्षक महेश कोळपकर आदी उपस्थित होते. महापालिकेच्या २० आरोग्य कर्मचाऱ्यांना जेवणाचे डबे वाटण्यात आले. दोनशे पंधरा नागरिकांनी रक्तदान केले. अॅड. नितीन लांडगे यांनीही रक्तदान करून नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले. नेत्र तपासणी शिबिरात १४० नागरिकांची तपासणी केली. २० नागरिकांच्या मोतीबिंदूची मोफत तपासणीही करण्यात आली. साडेतीनशे नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. तर १७० नागरिकांची रक्त तपासणी करण्यात आली. रक्तदान शिबिर भोसरीतील संजिवनी ब्लड बँकेच्या सहकार्याने घेण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शीतल गव्हाणे, आकाश गव्हाणे, संदेश गव्हाणे, योगेश गव्हाणे, हर्षल पवळे, नवनाथ शेळके, सुयश गव्हाणे, सार्थक गव्हाणे आदींनी परीश्रम घेतले.
पीसीएमसी चौक, भोसरी ः महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त घेतलेल्या कार्यक्रमात महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना जेवणाच्या डब्याचे वाटप करताना माजी नगरसेवक अॅड. नितीन लांडगे, पंडित गवळी व सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती फुगे. या वेळी मान्यवर उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com