भोसरीत कलाकृतींद्वारे मतदान जनजागृती

भोसरीत कलाकृतींद्वारे मतदान जनजागृती

भोसरी, ता. १२ : संपूर्ण देशभरात पार पडत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिघीतील गॅलेक्सी स्कूलमधील विद्यार्थी व शिक्षकांनी विविध कलाकृती तयार करून संविधानाने मतदारांना दिलेला मतदानाचा मूलभूत हक्क पार पाडण्याचे आवाहन केले. तर समर्थ टेक्निकल इन्स्टिट्यूटद्वारे मतदान करणाऱ्या मतदारांना पोहण्याची प्रशिक्षण विनामूल्य देण्यात येणार आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात दिलेला मतदानाचा मूलभूत हक्क सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करून पार पाडावा व आपल्या लोकशाहीला अधिक बळकट करावे, असे आवाहन शाळेतील विद्यार्थ्यांनी केले. तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलाकृतींतून जनजागृतीही केली. यावेळी शाळेच्या प्राचार्या मनीषा चौधरी यांच्यासह पालक, शिक्षक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
भोसरीतील श्री समर्थ टेक्निकल इन्स्टिट्यूटद्वारे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मतदारांना पोहण्याचे प्रशिक्षण मोफत देण्यात येणार असल्याची माहिती इन्स्टिट्यूटचे संचालक शशिकांत देसाई यांनी दिली. यावेळी देसाई म्हणाले, सध्या पोहता न आल्यामुळे बऱ्याच विद्यार्थी आणि नागरिकांना आपला जीव गमवावा लागण्याची वेळ येते. जनजागृती होऊन मतदान वाढावे, त्याचप्रमाणे पोहता न येण्यामुळे कोणालाही जीव गमवावा लागू नये यासाठी मतदारांना पोहण्याचे विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मतदारांनी मतदान केल्याचे दाखविल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला पोहण्याचे संपूर्ण प्रशिक्षण प्रशस्तीपत्रकासह विनामूल्य देण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com