पीएमटी चौकातील निखळलेले पेव्हिंग ब्लॉक बसवले

पीएमटी चौकातील निखळलेले पेव्हिंग ब्लॉक बसवले

Published on

भोसरी, ता. १ ः येथील पीएमटी चौकातील पुणे-नाशिक महामार्गाच्या सेवा रस्त्यावर महापालिकेच्या बीआरटीएस विभागाद्वारे केबल टाकण्याच्या कामानंतर पदपथावरील पेव्हिंग ब्लॉक बसविले नव्हते. त्यामुळे पदपथावर चर पडली होती. पदपथावरून भोसरी गावठाण व परिसरात ये-जा करण्याचा रस्ता असल्याने या चरीत रिक्षा व दुचाकी अडकून अपघात होत होता. या विषयाची बातमी ‘सकाळ’मध्ये शुक्रवारी (ता. २८) प्रसिद्ध झाल्यावर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बीआरटीएस विभागाने पदपथावरील निखळलेले पेव्हिंग ब्लॉक बसविल्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.