‘डॉक्टर्स डे’निमित्त 
सेवाभावी डॉक्टरांचा सत्कार

‘डॉक्टर्स डे’निमित्त सेवाभावी डॉक्टरांचा सत्कार

Published on

भोसरी, ता. ३ : प्रदीर्घकाळ रुग्ण आणि समाजसेवा केलेल्या डॉक्टरांचा ‘डॉक्टर्स डे’ दिनाचे औचित्य साधत निमाच्या चिंचवड शाखेद्वारे ‘आरोग्य सेवा सन्मान पुरस्कार’ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. सूर्यकांत भोईटे, डॉ. व्यंकटेश जोशी, डॉ. सुधीर काटे, डॉ. संजीव संभूस, डॉ. सुहास संभूस, डॉ. मोरेश्वर हुडुर, डॉ. दिलीप शर्मा, डॉ. भाग्यश्री शर्मा, डॉ. दत्तात्रेय कोकाटे, डॉ. सुहास जरिव, डॉ. मकरंद दानी आदींसह ३० डॉक्टरांचा ‘आरोग्य सेवा सन्मान पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी अॅड. अनिल शिंदे यांनी वैद्यकीय व्यवसाय करताना घ्यावयाची ‘न्याय वैद्यकीय काळजी’ या विषयावर मार्गदर्शन केले. निमाचे अध्यक्ष डॉ. प्रताप सोमवंशी यांनी निमाच्या कार्याचा आढावा घेतला. सचिव डॉ. रमेश केदार यांनी नवीन निमा भवनाची माहिती दिली. यावेळी डॉ. संजय देवाधर, डॉ. सत्यजित पाटील, डॉ. गणेश भोईर, डॉ. आत्माराम वानखेडे, डॉ. सुरेश बाफना, डॉ. नितीन निंबाने, विजय उपासनी आदींनीही मार्गदर्शन केले. यावेळी कोषाध्यक्ष डॉ. भाऊसाहेब वाघमोडे, डॉ. संगीता गायकवाड, डॉ. अमृत पेरणे, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. स्वप्ना डंगमाळी व कार्यकारिणी सदस्यांसह वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.