ऐन पावसाळ्यात वडमुखवाडी, चोविसावाडी भागांत पाणी टंचाई

ऐन पावसाळ्यात वडमुखवाडी, चोविसावाडी भागांत पाणी टंचाई

Published on

भोसरी, ता. २६ ः पावसाळा सुरू असताना आणि धरणे पूर्णपणे भरलेली असतानाही चऱ्होली, वडमुखवाडी, चोविसावाडी आदी परिसरातील काही भागांमध्ये पिण्याचे पुरेसे पाणी मिळत नसल्याने नागरिकांनी दिघीतील मॅगझीन चौकातील पाण्याच्या टाकीवर धडक हंडा मोर्चा काढला. तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेचा निषेध केला.
माजी नगरसेवक अजित गव्हाणे आणि विनया तापकीर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. चऱ्होली, वडमुखवाडी, चोविसावाडीमधील साईनगर, माऊलीनगर, लक्ष्मीनारायणनगर, ताजणे मळा, मोरयानगर भाग, विविध सोसायट्या, बुर्डे वस्ती, पठारे मळा, खडकवासला-बुर्डेवस्ती, थोरवे वस्ती, ताजणे वस्ती, माटे वस्ती, फुले वस्ती आदी भागांमधील नागरिकांना नळांद्वारे पिण्याचे पाणी जेमतेम अर्धा तास येत आहे. त्यामुळे, सागर तापकीर, प्रदीप तापकीर, अनुज तापकीर, कुणाल तापकीर, अनिल तापकीर, तुकाराम तापकीर, सुनील पठारे, संतोष चिकणे, मुकुंद शेळके, मीरा काळजे, माधुरी भोसले, रूपाली गिलबिले, मृणालिनी नाचरे, माधुरी भोसले, सुषमा ढोकळे, चंद्रभागा गायकवाड, अश्विनी चव्हाण, मोनिका वाघमारे आदी नागरिकांनी संताप व्यक्त केला. सैन्यात असताना शत्रूंशी युद्ध केले. आता येथे पाण्यासाठीही लढावे लागण्याची वेळ आल्याची कैफियत माजी सैनिक एकनाथ आहेर, सुनील पाटील यांनी मांडली. यावेळी महापालिकेच्या चऱ्होली भागात पाणी पुरवठा करणाऱ्या अभियंत्याची हकालपट्टी करण्याच्या घोषणा देण्यात आल्या.
माजी नगरसेवक अजित गव्हाणे म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड महापालिका भामा आसखेड, आंध्रा धरणातून पुरेसे पाणी उचलत नसल्याने अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. येथील नागरिकांना पाण्याचे टॅंकर आणण्यासाठी हजारो रुपये खर्च करण्याची वेळ आली आहे. याला महापालिका प्रशासन जबाबदार आहे.’’

महापालिकेचा कर वेळेवर भरत असतानाही पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे, या गैरसोयीच्या निषेधार्थ आम्ही आता कर न भरण्याचा निर्णय घेतला आहे.’’
- अनिता दरेकर, स्थानिक महिला
PNE24U41025

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com