एक रहेंगे, तो सेफ रहेंगे
भोसरीत लांडगे यांच्या प्रचार सभेत योगी आदित्यनाथ यांचा नारा

एक रहेंगे, तो सेफ रहेंगे भोसरीत लांडगे यांच्या प्रचार सभेत योगी आदित्यनाथ यांचा नारा

Published on

भोसरी, ता. १७ ः हिंदू विखुरलेले असल्‍यामुळे विशाळगडावर अतिक्रमण झाले. अयोध्या- काशी- मथुरामध्ये अपमान सहन करावा लागला. १९४६ मध्ये लाखो हिंदूंची हत्त्या झाली. सनातनींवर होणारा हल्ला हा भारतावरील हल्ला आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, ‘अब बटेंगे नही तो, कटेंगे भी नही, एक रहेंगे तो सेफ रहेंगे,’ असे नारा पुन्‍हा एकदा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भोसरीत दिला.
भोसरी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्‍या प्रचारार्थ भोसरीतील गावजत्रा मैदानावर आयोजित सभेत मुख्यमंत्री योगी आदित्‍यनाथ बोलत होते. खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, योगेश बहल, वसंत लोंढे, मंगला कदम, माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, माजी नगरसेवक अॅड. नितीन लांडगे, चंद्रकांता सोनकांबळे, सुजाता पालांडे, दत्ता गायकवाड, विजय फुगे, संतोष लोंढे, विकास डोळस, कविता आल्हाट, अप्पा सायकर आदींसह माजी नगरसेवक, महायुतीतील पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्‍हणाले, “भारताच्या हिताचे निर्णय घेण्याचा कॉंग्रेसच्या नेत्तृत्त्वाने कधीच विचार केला नाही. कॉंग्रेसने १९४६ मध्ये सत्तेची लालसा धरली नसती तर भारत अखंड राहिला असता. लाखो निर्दोष हिंदूंच्या हत्याही झाल्या नसत्या. महाराष्ट्रात नव्या सरकारसाठी निवडणूक होत आहे. पुन्हा दोन पक्ष समोरासमोर आहेत. एक पक्ष पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, रामदास आठवले महायुतीचे नेतृत्व करत आहेत. मोदी यांनी गेल्या दहा वर्षात सर्वांचा विकास, सर्वांचे संरक्षण, कोणावरही अन्याय नाही. एकीकडे भारताला जोडणाऱ्या पक्षाची ताकद एक भारत, श्रेष्ठ भारतच्या रुपाने महायुतीबरोबर आहे. तर महाआघाडीच्या रूपाने महाअनाडी गठबंधन आहे. त्यांच्याकडे ना निती, ना नियत आहे. निर्णय घेण्याची त्यांची क्षमता नाही. सबका साथ आणि परिवाराचा विकास, हा त्यांचा नारा आहे.’’

योगी आदित्‍यनाथ म्‍हणाले....
- स्वराज्याची स्थापना कशी असावी, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकविले
- अटकेपासून कटकपर्यंत भारत कसा असला पाहिजे, हे बाजीराव पेशवे यांनी शिकविले
- स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क असल्याचे सांगणारे बाळ गंगाधर टिळक यांचे नेतृत्व महाराष्ट्राने दिले
- महिलांच्या शिक्षणाचे भारत सशक्त होईल, याची शिकवण सावित्रीबाई फुले यांनी दिली
- १८५७ च्या स्वातंत्र्याच्या रणसंग्रामाची व्याख्या याच भूमीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अमर केली
- सर्व नागरिक समान आहेत, हा संदेश देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरही याच धरतीवरील आहेत
- महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा प्रयत्न महाअनाडी गटबंधनाद्वारे करण्यात येत आहे
- विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राला सावध करण्यासाठी आलो आहे

‘‘लोकप्रतिनिधी म्हणून गावजत्रा मैदानावर व्हिजन २०-२०च्या माध्यमातून भोसरी विधानसभेतील विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यात यश मिळाले. त्यामुळे मतदारसंघात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. समर्पित आयुष्य जगणारा, त्यागी व्यक्ती, माझ्या निवडणूक प्रचारास आल्याने माझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुत्व घेऊन पुढे चाललो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीला पुढे घेऊन सर्व महिलांना सुरक्षित वातावरण देऊन हिंदुत्वाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला. गोमातेच्या रक्षणासाठीही आम्ही कठोर पावले उचलणार आहोत.
- महेश लांडगे, आमदार तथा उमेदवार, भोसरी मतदारसंघ, महायुती

फोटोः 63460.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com