महामार्गावरील न भरलेल्या 
साईट पट्ट्यांमुळे धोका

महामार्गावरील न भरलेल्या साईट पट्ट्यांमुळे धोका

Published on

भोसरी, ता. ११ ः पुणे-नाशिक महामार्गाच्या गुडवील चौक ते स्पाइन रस्त्यावरील राजे छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंतच्या रस्त्यावरील दोन्ही बाजूकडच्या साइडपट्ट्या भरल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे दुचाकी वाहन चालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
भोसरीतील पुणे-नाशिक महामार्गाच्या रस्त्यावर गुडवील चौक आणि लांडेवाडीतील ऐतिहासिक प्रवेशद्वाजवळील चौकात वाहतूक नियंत्रक दिवे बसवले आहेत. त्यामुळे वाहने येथे थांबतात. काही दुचाकी चालक रस्त्याच्याखाली उतरून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र येथील रस्त्याची साइडपट्टी भरली गेलेली नाही. काही ठिकाणी अर्धा ते एक फुटापर्यंत रस्त्याच्याकडेला खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे दुचाकी चालक रस्त्यावर येण्याचा प्रयत्न करत असताना दुचाकी घसरून त्यांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. दुचाकी चालक रस्त्यावरच घसरून पडत असल्यामुळे पाठीमागून येणाऱ्या वाहनामुळे अपघात होण्याची शक्यता असल्याने त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे धावडेवस्ती ते स्पाइन रस्त्यावरील राजे छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंतच्या रस्त्यावरील साइडपट्टी भरली गेलेली नाही. त्यामुळे या ठिकाणीही दुचाकी चालकांना अपघात होण्याची शक्यता निर्माण झाला आहे. या रस्त्यावरील साइडपट्ट्या तातडीने भरण्याची मागणी वाहनचालकांधून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com