श्री भैरवनाथ उत्सवात कुस्त्या, बैलगाड्यांचा थरार

श्री भैरवनाथ उत्सवात कुस्त्या, बैलगाड्यांचा थरार
Published on

भोसरी, ता. ३० : भोसरीचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यांच्या उत्सवातील आखाड्यात नामांकित पहिलवानांच्या कुस्त्यांची झुंज आणि बैलगाड्यांचा थरारही पाहता येणार आहे. गुढीपाडव्यानिमित्त घेण्यात आलेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत पानांच्या विड्याद्वारे पंचांग सांगत ग्रामस्थांनी परंपरा जपली आहे. बैठकीत १५ व १६ एप्रिल रोजी होणाऱ्या उत्सवाचा आढावाही घेण्यात आला.
भोसरी गावठाणातील श्री भैरवनाथ मंदिरात घेण्यात आलेल्या बैठकीत आमदार महेश लांडगे, उत्सव कमिटी अध्यक्ष जंगल फुगे, माजी नगरसेवक वसंत लोंढे, अजित गव्हाणे, अॅड. नितीन लांडगे, विश्वनाथ लांडे, राजेंद्र लांडगे, विजय फुगे आदींनी उत्सवाचा आढावा घेतला.
यावेळी पहिलवान किसनराव शिंदे, नामदेव लांडगे, मदन गव्हाणे, विनय लांडगे, सम्राट फुगे, विलास फुगे, नारायण गव्हाणे आदी उपस्थित होते. बैठकीत माजी नगरसेवक पंडीत गवळी, भानुदास फुगे, अॅड. अमर लांडगे, अॅड. राहुल गवळी, अशोक लांडगे, शेखर लांडगे, सुदाम माने-पाटील आदिंनी उत्सवासंबंधी सूचना मांडल्या.
उत्सवानिमित्त १५ एप्रिल रोजी घाटात बैलगाड्यांच्या शर्यतीचा थरार सकाळी नऊ वाजल्यापासूनच शौकिनांना अनुभवता येणार आहे. यामध्ये उत्सव कमिटीद्वारे साडेपाच लाखांच्या बक्षिसांसह वैयक्तिक बक्षिसेही विजयी बैलगाड्यांना मिळणार आहे. तर, १६ एप्रिल रोजी गावजत्रा मैदानातील कुस्ती आखाड्यात ग्रीक रोमन महाराष्ट्र केसरी शुभम सिंदनाडे, महाराष्ट्र केसरी हर्षद सादगीर, उपमहाराष्ट्र केसरी वेताळ शेळके, प्रकाश बनकर, महाराष्ट्र चॅम्पियन संदीप मोठे, तुषार डुबे आदिंसह नामांकित पैलवानांच्या निकाली कुस्त्यांची थरारक झुंजीचा आनंद घेता येणार आहे.

छबिना मिरवणूक, चक्रीभजन आणि तमाशा
उत्सवानिमित्त १५ एप्रिलला सायंकाळी सात वाजता ढोल-लेझीम खेळासह छबिना मिरवणूक निघणार आहे. गावजत्रा मैदानात संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर लोकनाट्य तमाशा विनायक महाडिक पुणेकर सादर करणार आहेत. १६ एप्रिलला भैरवनाथ मंदिरात सकाळी आठ वाजता चक्रीभजनाला सुरुवात होणार आहे.

बारा महिन्यांचे बारा विडे आणि पंचांग
गुढीपाडव्याला उत्सवासंबंधी अशी बैठक अनेक वर्षांपासून घेण्यात येते. या बैठकीत बारा महिन्यांचे वडाच्या पानाचे विडे तयार केले जातात. त्यामध्ये आदल्या दिवशी विड्यामध्ये ज्वारी, बाजरी, साळी आदी धान्य ठेवून त्य विड्यांना मराठी महिन्यांची नावे दिली जातात. पाडव्याच्या बैठकीत प्रत्येक विडा गावच्या पुरोहिताद्वारे उघडून ऋतूंचा अंदाज व पंचांग सांगितले जाते. रविवारी (ता.३०) झालेल्या बैठकीत हेमंत तिखे यांनी विड्यावरून पंचांग सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com