

दिघीमध्ये मिरवणूक
भोसरी : गुढीपाडव्यानिमित्त दिघी ग्रामस्थांनी दुचाकीवरून मिरवणूक काढत नववर्ष साजरे केले. यावेळी ग्रामस्थ पारंपारिक वेशभूषेत सहभागी झाले होते. शोभायात्रेला सुरवात दिघीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून करण्यात आली. गुढीची मिरवणूक काढण्यात आली. या गुढीचे जागोजागी नागरिकांनी दर्शन घेतले. ही शोभायात्रा दिघीतील साई पार्क, छत्रपती संभाजी महाराज चौक, शिवनगरी, हिंदू कॉलनी, सावंतनगर कमान, महादेवनगर, आदर्शनगर, भारतमातानगर, गजानन महाराज कॉलनी, मॅक्झिन चौक, बीयू भंडारी, लक्ष्मीनगर, गायकवाडनगर, रुणवाल पार्क, विजयनगर, दिघी गावठाणातून पुन्हा विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आणण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.