भोसरीतील आळंदी रस्त्यावर फुगेवस्तीजवळ वाहतूक कोंडी

भोसरीतील आळंदी रस्त्यावर 
फुगेवस्तीजवळ वाहतूक कोंडी
Published on

भोसरी, ता. १८ ः येथील आळंदी रस्त्यावरील फुगेवस्तीजवळील दिघीतील भारतमातानगरकडे जाणाऱ्या रस्ता चौकात वाहतूक पोलिसांची नियुक्ती नसल्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. येथे वाहतूक पोलिस अथवा वॉर्डनची नियुक्ती करण्याची मागणी वाहन चालकांमधून होत आहे.
भोसरीतील दिघी रस्त्यावर जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे दिघी रस्ता सोमवारपर्यंत (ता. २१) वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे दिघीतून भोसरी व पिंपरी-चिंचवड शहर परिसरात ये-जा करणारे वाहनचालक दिघीतील भारतमातानगरकडून आळंदी रस्त्याला जोडणाऱ्या मार्गाचा उपयोग करत आहेत. भोसरीतील आळंदी रस्त्यावरील फुगेवस्ती चौकात वाहनचालक अस्ताव्यस्त वाहने चालवत असल्याने या चौकात वाहनांची प्रचंड कोंडी होत आहे. मुळातच आळंदी रस्त्यावर वाहनांची प्रचंड वर्दळ असते. त्यातच दिघी रस्त्याने ये-जा करणारी वाहनेही आळंदी रस्त्यावर येत असल्याने या चौकात कोंडी होत आहे. या ठिकाणी वाहतूक पोलिस अथवा वॉर्डन नसल्याने वाहतूक कोंडी सुटण्यास अधिक वेळ लागत आहे. त्यामुळे वाहन चालकांमधून संताप व्यक्त होत आहे. या रस्त्यावर तातडीने वाहतूक पोलिसाची नियुक्ती करण्याची मागणी वाहन चालकांमधून होत आहे. या विषयी भोसरी वाहतूक पोलिसांशी संपर्क होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com