

भोसरी, ता. १ ः जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त भोसरी आणि इंद्रायणीनगर परिसरात मोबाईल व्हॅनद्वारे माहितीपट दाखवत जनजागृती मोहीम राबविण्यात आली. तंबाखू सेवनाने होणाऱ्या कॅन्सरसह विविध आजारांवर डॉ. प्रांजली काटे आणि डॉ. किर्तीराज काटे यांनी माहितीपट तयार केले आहेत. हे माहितीपट मोबाईल व्हॅनद्वारे भोसरी, इंद्रायणीनगर परिसरातील चौकाचौकांतून दाखविण्यात आले. या उपक्रमात तंबाखू, सिगरेट, गुटखा, दारू, सुपारी, मिश्री यांसारख्या व्यसनांचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम समजावून सांगणाऱ्या माहितीपटांचा समावेश होता. याविषयी डॉ. किर्तीराज काटे म्हणाले, ‘‘या उपक्रमाचा मुख्य उद्देश विशेषतः तरुण पिढीला व्यसनांपासून दूर ठेवणे, त्यांचे भान जागवणे आणि समाजात आरोग्याविषयी सजगता वाढवणे असा होता.’’
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.