मोहरमनिमित्त भोसरीत ताबुतांची मिरवणूक
भोसरी, ता. ६ ः मोहरमनिमित्त भोसरी परिसरामधून पंजा आणि ताबुताची मिरवणूक काढण्यात आली. नागरिकांनी जागोजागी ताबुताचे दर्शन घेतले. मिरवणुकीनंतर ताबुताचे इंद्रायणी नदीत विसर्जन करण्यात आले.
हजरत इमाम हुसेन यांचा त्याग, न्यायासाठीचा संघर्ष व बलिदान यांचे स्मरण करण्यासाठी त्याचप्रमाणे शांती, सहिष्णुता व धैर्याचा संदेश जनसामान्यांमध्ये पोहचविण्यासाठी मुस्लिम बांधवांद्वारे ताबूत आणि पंजाची मिरवणूक काढली जाते. भोसरी परिसरातून गुरुवारी ताबुताची तर शनिवारी (ता. ५) ताबूत आणि पंजाची मिरवणूक काढण्यात आली. रविवारी (ता. ६) ताबुताची विसर्जन मिरवणूक भोसरीतील गवळीनगर, भोसरी गावठाण, लांडगे आळी, धावडे आळी आदी मार्गाने काढण्यात आली. त्यानंतर त्यांचे इंद्रायणी नदीत विसर्जन करण्यात आले.
मिरवणुकीत कासमभाई सय्यद, अब्बास सय्यद, करीम सय्यद, शफीक सय्यद, मुबारक सय्यद, हुसेन सय्यद, फिरोज सय्यद, इनुस शेख, अम्रुद्दीन शेख, सलीम शेख, शकील सय्यद आदींसह मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. या वेळी जागजागी नागरिकांनी ताबूताचे दर्शन घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.