इंद्रायणीनगरात झाडांच्या फांद्या धोकादायक

इंद्रायणीनगरात झाडांच्या फांद्या धोकादायक

Published on

संजय बेंडे : सकाळ वृत्तसेवा
भोसरी, ता. ११ : इंद्रायणीनगर परिसरात झाडांच्या फांद्या पडून वाहने आणि घरांचे नुकसान झाले आहे. या परिसरात अशा घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेने धोकादायक झाडांची पाहणी करावी, फांद्यांची छाटणी करावी, अशी मागणी होत आहे.

नाशिक महामार्गावर भोसरी पोलिस ठाण्यासमोर चालत्या दुचाकीवर झाड कोसळून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला होता. ही घटना ६ ऑगस्ट २०२२ रोजी घडली. यानंतर प्रामुख्याने धोकादायक फांद्यांचा मुद्दा ऐरणीवर आला. इंद्रायणीनगर परिसर हा बंगले आणि इमारतींनी व्यापलेला आहे. बंगल्याजवळ आणि रस्त्याकडेला मोठी झाडे आहेत. काही फांद्या रस्त्यावर पडण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. पेठ क्रमांक दोनमधील इमारत क्रमांक ४८, ५४, ५७, ५८, पेठ क्रमांक एकमधील वैष्णोमाता कॉलनी, पेठ क्रमांक तीनमधील श्रीकृष्णपुरम सोसायटी इतरत्रही धोकादायक झाडे असल्याच्या तक्रारी आहेत.
या विषयी महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक राजेश वसावे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनी ‘‘मीटिंगमध्ये आहे’’ असा मेसेज पाठविला. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.


इंद्रायणीनगरात झाडे पडल्याच्या घटना

दिनांक ठिकाण नुकसान

७ जुलै पेठ क्रमांक ३, प्रान्सी हाईट्स सोसायटी विद्युत डीपी बॉक्सचे नुकसान

२ जुलै प्रा. रामकृष्ण मोरे उद्यानालगत,
पोलिस लाइन, इमारत क्रमांक ५. नुकसान नाही

१३ जून पेठ क्रमांक २, प्लॉट क्रमांक २४६ शेजारील बंगल्याचे प्रवेशद्वार तुटले
हनुमान मंदिराजवळ. सौरदिव्याचे नुकसान

२१ मे पेठ क्रमांक २, इमारत क्रमांक ४८ विद्युत डीपी बॉक्सचे नुकसान

२९ एप्रिल पेठ क्रमांक १, महाराष्ट्र कॉलनी,
श्रीराम निवास, प्लॉट क्रमांक ३१७ चारचाकी वाहनांच्या काचा फुटल्या

२५ एप्रिल पेठ क्रमांक ७, शांतिनिकेतन कॉलनी,
ज्ञानेश्वरी निवास. दुचाकीचे नुकसान

२१ एप्रिल पेठ क्रमांक २, निसर्ग कॉलनी,
प्लॉट क्रमांक २४१ नुकसान नाही.


माझ्या घराजवळ धोकादायक झाड आहे. वाऱ्यामुळे ते बुंध्यापासून हालत आहे. त्यामुळे ते पडण्याचा धोका आहे. चार वर्षांपूर्वी त्याच्या फांद्या छाटल्या होत्या. मात्र, आता फांद्या पुन्हा विस्तारल्या आहेत. आठ दिवसांपूर्वी महापालिकेच्या ‘सारथी’ प्रणालीवर तक्रार केली. मात्र, अद्यापपर्यंत महापालिकेद्वारे कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
- चंद्रकांत नाणेकर, ज्ञानेश्वरी मार्ग, इंद्रायणीनगर.

पदपथावरील गुलमोहराचे झाड आमच्या बंगल्याच्या गेटवर पडले. त्यामुळे गेट पूर्णपणे तुटले. त्याचप्रमाणे सौरदिवाही तुटला. सुदैवाने झाड पडण्याच्या वेळेस अंगणात कोणी नव्हते. घरासमोरच एका झाडाला वाळवी लागली आहे. त्यामुळे बुंधा पोकळ झाला आहे. गुलमोहराचे झाड काढण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की ते पडणार नाही.
- विनय टिळक, गुलमोहर बंगला, पेठ २, इंद्रायणीनगर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com