लहान मुले, महिलांसाठी स्पर्धा, खेळ अन् मनोरंजन

लहान मुले, महिलांसाठी स्पर्धा, खेळ अन् मनोरंजन

Published on

भोसरी, ता. ३१ ः इंद्रायणीनगर, दिघी परिसरातील गणेशोत्सव मंडळांनी साधेपणाने देखावे सादर करत महिला, लहान मुला-मुलींसाठी विविध स्पर्धा, खेळांचे आयोजन केले जात आहे. मनोरंजनाबरोबरच त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला जात आहे; तर भोसरीतील दिघी रस्त्यावरील गणेश मंडळांनी इतिहासाच्या माहितीसह जिवंत देखाव्यातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.

चमचमती विद्युत रोषणाई
इंद्रायणीनगरातील श्री साई चौक मित्र मंडळाने आकर्षक विद्युत रोषणाईतील गणेश मंदिर उभारले आहे. मंडळाचे यंदाचे २० वे वर्ष असून माजी नगरसेवक विलास मडिगेरी हे मंडळाचे अध्यक्ष आहेत. मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या अथर्वशीर्ष मंत्र पठणाच्या कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

आकर्षक पुष्पमहाल
इंद्रायणीनगरातील पेठ क्रमांक दोनमधील साम्राज्य प्रतिष्ठानद्वारे आकर्षक पुष्पमहाल सादर केला आहे. मंडळाचे यंदाचे १९ वे वर्ष असून हर्षद भालेराव मंडळाचे अध्यक्ष आहेत.

मनमोहक महाल
इंद्रायणीनगरातील पेठ क्रमांक दोनमधील नवजीवन मित्र मंडळाद्वारे आकर्षक महाल तयार केला आहे. महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेण्यात आला. अमित फ्रान्सिस हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.

फुलांची आरास
इंद्रायणीनगरातील वीर हनुमान मित्र मंडळाद्वारे आकर्षक फुलांची आरास तयार केली आहे. मंडळाचे हे २१ वे वर्ष असून सूरज झांजुर्णे मंडळाचे अध्यक्ष आहेत.

फुलांची सजावट
इंद्रायणीनगरातील मोरया प्रतिष्ठानद्वारे पुष्प महाल तयार केला आहे. मंडळाचे हे २४ वे वर्ष असून प्रशांत माळी मंडळाचे अध्यक्ष आहेत.

श्रीकृष्ण-राधा वृंदावन
इंद्रायणीनगरातील पोलिस वसाहतीमधील सुवर्णयुग मित्र मंडळाद्वारे श्रीकृष्ण-राधा वृंदावन हा आकर्षक देखावा सादर केला आहे. मंडळाचे हे ३२ वे वर्ष असून ब्रह्मानंद कोरपे मंडळाचे अध्यक्ष आहेत.

भव्य बालाजी मंदिर
अंकुशनगरमधील सिद्धेश्वर युवा क्रांती मित्र मंडळाद्वारे चाळीस फूट उंच, तीस फूट लांब आणि २५ फूट रुंदीचे भव्य बालाजी मंदिर उभारले आहे. मंडळाचे यंदाचे ३६ वे वर्ष असून प्रकाश लांडगे हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.

स्त्री शक्तीवर जिवंत देखावा
भोसरीतील दिघी रस्त्यावरील आदर्श मित्र मंडळाद्वारे ‘एक दिवस’ या जिवंत देखाव्यातून स्त्री शक्तीची महिमा सादर केली आहे. मंडळाचे हे ४४ वे वर्ष असून उमेश उगले मंडळाचे अध्यक्ष आहेत.

भव्य गजमहाल
दिघी रस्त्यावरील नवज्योत मित्र मंडळाद्वारे २७ फूट उंचीचा गजमहाल उभारला आहे. मंडळाचे हे ३९ वे वर्ष असून सोमेश्वर काकडे मंडळाचे अध्यक्ष आहेत.

सिंहगड संग्रामावर जिवंत देखावा
दिघी रस्त्यावरील नरवीर तानाजी तरुण मंडळाद्वारे ‘गड आला पण, सिंह गेला’ हा जिवंत देखावा सादर केला आहे. मंडळाचे हे ४३ वे वर्ष असून आदित निकम मंडळाचे अध्यक्ष; तर माजी नगरसेवक विजय फुगे हे मार्गदर्शक आहेत.

इतिहास-आधुनिकतेची तुलना
खंडोबामाळमधील खंडोबा मित्र मंडळाद्वारे ‘मी छत्रपती शिवाजीराजे भोसले बोलतोय !’ या जिवंत देखाव्यातून इतिहास आणि आधुनिक काळाची तुलना केली आहे. माजी नगरसेवक जालिंदर शिंदे मंडळाचे अध्यक्ष आहेत.

पांडुरंग माऊली

दिघी रस्त्यावरील जय भवानी तरुण मित्र मंडळाद्वारे ‘पांडुरंग माऊली’ हा देखावा सादर केला आहे. मंडळाचे हे ३९ वे वर्ष असून आकाश गवळी मंडळाचे अध्यक्ष आहेत.

आकर्षक विद्युत महाल
दिघी रस्त्यावरील भोजराज तरुण मित्र मंडळाद्वारे आकर्षक विद्युत महालात श्री गणेशाला विराजमान केले आहे. मंडळाचे २९ वे वर्ष असून तेजस फुगे हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.

हस्तकलेचे नक्षीकाम
दिघीतील शिवसह्याद्री प्रतिष्ठानद्वारे हस्तकलेतील नक्षीकामात श्री गणेशाला विराजमान केले आहे. मंडळाचे २४ वे वर्ष असून पवन सोनवणे हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.

लक्षवेधक महाल
दिघीतील आदर्शनगरातील अष्टविनायक सेवा प्रतिष्ठानद्वारे आकर्षक महाल तयार केला असून मंडळाचे हे २० वे वर्ष आहे. अनिकेत धावडे मंडळाचे अध्यक्ष आहेत.

सामाजिक उपक्रम
कृष्णानगरातील नवचैतन्य मित्र मंडळाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असून आकर्षक फुलांच्या सजावटीत गणेशाची स्थापना केली आहे. रितेश लोंढे मंडळाचे अध्यक्ष आहेत. रौप्य महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनास आणि मोफत आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

फुलांची आरास
दिघी गावठाणातील समस्त गावकरी मंडळाद्वारे आकर्षक फुलांची आरास तयार केली आहे. योगेश वाळके हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.

अष्टविनायक तीर्थक्षेत्र
दिघी गावठाणातील सह्याद्री क्रीडा मंडळाद्वारे अष्टविनायक तीर्थक्षेत्राचा देखावा सादर केला आहे. महेश तापकीर मंडळाचे अध्यक्ष आहेत.

नवनाथ महाराज दर्शन
दिघीतील चौधरी पार्कमधील रिद्धीसिद्धी मित्र मंडळाद्वारे नवनाथ महाराजांचे दर्शन हा देखावा सादर केला आहे. जय फरताळे मंडळाचे अध्यक्ष आहेत.

देखावे साधे, तरीही गर्दी
इंद्रायणीनगर आणि दिघी परिसरातील काही मंडळांनी साधे देखावे सादर केले आहेत. मात्र, महिला, लहान मुले-मुली यांच्यासाठी संगीत खुर्ची, लिंबू-चमचा, रांगोळी, मटकी फोड, पोते उड्या, तीन पायांची शर्यत, गायन आदी स्पर्धेच्या माध्यमातून स्थानिकांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मंडळांनी साधे देखावे केले असले तरी स्पर्धेची रंजकता पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com