पौराणिक, जिवंत देखावे अन् शंभूराजांचा पराक्रम

पौराणिक, जिवंत देखावे अन् शंभूराजांचा पराक्रम

Published on

भोसरी, ता. १ ः भोसरी गावठाण परिसरात यावर्षी गणेश मंडळांनी जिवंत देखाव्यावर अधिक भर दिला आहे. त्यातही छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी आणि गौरवशाली इतिहासाचा थरार मंडळांनी जिवंत देखाव्यातून सादर केला आहे. त्याचप्रमाणे पौराणिक देखावे सादर करत भाविकांची गर्दी खेचण्यात मंडळे यशस्वी झाली आहेत.

आकर्षक महाल
आळंदी रस्त्यावरील श्री गणेश तरुण मंडळाद्वारे आकर्षक महाल उभारून श्री गणेशाची स्थापना केली आहे. मंडळाचे हे ५३ वे वर्ष असून राहुल गवळी मंडळाचे अध्यक्ष आहेत.

लक्षवेधक नंदीमूर्ती
आळंदी रस्त्यावरील जय महाराष्ट्र तरुण मित्र मंडळाने भव्य नंदीमूर्तीचा देखावा तयार केला आहे. मंडळाचे हे २७ वे वर्ष असून अभिषेक जाधव मंडळाचे अध्यक्ष आहेत.

हुंडाबळीवर जिवंत देखावा
पीसीएमसी चौकातील कै. भगवान गव्हाणे मित्र मंडळाद्वारे ‘हुंडाबळी’ हा जिवंत देखावा सादर करण्यात आला आहे. मंडळाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून अजित रमेश गव्हाणे मंडळाचे अध्यक्ष आहेत.

प्रतापगडची लढाई
पीसीएमसी चौकातील कै. दामुशेठ गव्हाणे मित्र मंडळाद्वारे ‘दहशतवाद असाच संपविला पाहिजे’ या जिवंत देखाव्याद्वारे छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यातील लढाईचा प्रसंग जिवंत केला आहे. योगेश गव्हाणे हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.

वटसावित्री व्रताचे महत्व
रसाळवाड्यातील श्री गणेश मित्र मंडळाद्वारे ‘वट सावित्रीव्रताचे महत्व’ हा हालता देखावा सादर केला आहे. मंडळाचे हे ४५ वे वर्ष असून नवनाथ रसाळ हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.

मराठी भाषेची महती
भोसरी गावठाणातील लांडगे ब्रदर्स ॲण्ड फ्रेंड्स सर्कलद्वारे ‘लाभले आम्हास भाग्य’ या जिवंत देखाव्यातून मराठी भाषेची महती सांगितली आहे. मंडळाचे हे ४७ वे वर्ष असून अनिल दशरथ लांडगे मंडळाचे अध्यक्ष आहेत.

मयूर महाल
भोसरी गावठाणातील समस्त मधले फुगे तालीम मंडळाद्वारे मयूर महाल उभारला आहे. मंडळाचे हे ६८ वे वर्ष असून सिद्धार्थ फुगे मंडळाचे अध्यक्ष आहेत.

अष्टविनायक महाल
भोसरी गावठाणातील पाचारणे वाड्यातील श्री कानिफनाथ मित्र मंडळाद्वारे अष्टविनायक महाल उभारला आहे. मंडळाचे ४३ वे वर्ष असून मयूर पाचारणे मंडळाचे अध्यक्ष आहेत.

शंभूराजांचा इतिहास
समस्त गव्हाणे तालीमद्वारे ‘डरकाळी वाघाची, शिवसह्याद्रीच्या छाव्याची’ या जिवंत देखाव्यातून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगितला आहे. मंडळाचे हे ९३ वे वर्ष असून सुनील शंकर गव्हाणे हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.

गोहत्या मुक्त हिंदूराष्ट्र
लांडगे आळीतील श्रीराम मित्र मंडळाद्वारे ‘गोहत्या मुक्त हिंदूराष्ट्र’ हा जिवंत देखावा सादर केला आहे. मंडळाचे हे ४२ वे वर्ष असून गणेश लांडगे मंडळाचे अध्यक्ष आहेत.

वाटिका वध
भोजेश्वर चौकातील भोजेश्वर मित्र मंडळाद्वारे ‘वाटिका वध’ हा हालता पौराणिक देखावा सादर केला आहे. मंडळाचे हे ४९ वे वर्ष असून अभिषेक लोंढे मंडळाचे अध्यक्ष आहेत.

शेतीबाबत जनजागृती
बापुजी बुवा चौकातील लोंढे तालीम मित्र मंडळाद्वारे ‘शेती आणि नीती विकायची नाय, राखायची!’ हा जिवंत देखावा सादर करत जनजागृती केली आहे. मंडळाचे हे २७ वे वर्ष असून सोहम लोंढे हे
मंडळाचे अध्यक्ष आहेत.

योगी शंकर महाराज कथा
भोसरी गावठाणातील पठारे लांडगे तालीम व्यायाम मंडळाद्वारे ‘योगी शंकर महाराज कथा’ हा हालता पौराणिक देखावा सादर केला आहे. मंडळाचे हे ६८ वे वर्ष असून अशोक पठारे मंडळाचे अध्यक्ष आहेत.

ज्योतिबाची चैत्र यात्रा
लांडगे लिंबाची तालीम मंडळाने ‘ज्योतिबाची चैत्र यात्रा’ हा हालता देखावा सादर केला आहे. मंडळाचे हे ७३ वे वर्ष असून संतोष लांडगे मंडळाचे अध्यक्ष आहेत.

जयपूरचा शिश महल
गावठाणातील फुगे-माने तालीम मंडळाद्वारे जयपूरमधील शिशमहाल उभारला आहे. मंडळाचे हे ७६ वे वर्ष आहे. सम्राट फुगे हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.

आकर्षक फुलांची आरास
बापूजीबुवा चौकातील आझाद मित्र मंडळाद्वारे आकर्षक फुलांची आरास तयार केली आहे. मंडळाचे हे ४९ वे वर्ष असून सचिन शंकर लांडगे मंडळाचे अध्यक्ष आहेत.

बालाजी मंदिर
धावडे वस्तीतील अंकुशनगरमधील सिद्धेश्वर युवा क्रांती मित्र मंडळाद्वारे चाळीस फूट उंचीचे भव्य श्री बालाजी मंदिर उभारले आहे. प्रकाश लांडगे हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.

होलिका दहन
गावठाणातील छत्रपती श्री शिवाजी तरुण मंडळाने ‘होलिका दहन’ हा पौराणिक हालता देखावा सादर केला आहे. मंडळाचे हे ६८ वे वर्ष असून सुनील भोसले हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.

कोंडाजी फर्जंद यांचे शौर्य
लांडेवाडीतील नव महाराष्ट्र मित्र मंडळाद्वारे ‘वाघातला वाघ कोंडाजी फर्जंद’ या जिवंत देखाव्यातील कोंडाजी फर्जंद यांचे शौर्य दाखविले आहे. मंडळाचे हे ६२ वे वर्ष असून माजी नगरसेवक विक्रांत लांडे मंडळाचे अध्यक्ष आहेत.

शंभूराजांच्या इतिहासावर प्रकाश
लांडेवाडीतील विनर्स मित्र मंडळाद्वारे ‘शंभुराजे’ या जिवंत देखाव्यातून छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासाला जिवंत केले आहे. मंडळाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असून गौरव दळवी मंडळाचे अध्यक्ष आहेत.

श्री बालाजी मंदिर
लांडेवाडीतील विकास कॉलनीमधील श्री शिवाजी मित्र मंडळाद्वारे श्री बालाजी मंदिर उभारले आहे. मंडळाचे हे ३८ वे वर्ष असून आदेश लोंढे मंडळाचे अध्यक्ष आहेत.


चांगदेवांचे गर्वहरण
पीसीएमसी चौकातील अष्टविनायक मंडळाद्वारे ‘चालविली जड भिंती, हरली चांगदेवाची भ्रांती’ या जिवंत देखाव्यातून संत ज्ञानेश्वर महाराज यांची महती सांगितली आहे. मंडळाचे हे ३३ वे वर्ष असून तुकाराम शेळके मंडळाचे अध्यक्ष आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com