गेनभाऊ आल्हाट, स्वप्निल मळेकर यांचा बैलगाडा प्रथम
भोसरी, ता. २ ः गणेशोत्सवानिमित्त भोसरी येथे आयोजित पाच दिवसीय बैलगाडा शर्यतीत गेनभाऊ आल्हाट आणि स्वप्नील मळेकर यांच्या बैलगाड्याने १२.५१ सेकंदात शर्यत पूर्ण करत पहिला क्रमांक मिळविला. गुलाबराव गिलबिले यांच्या बैलजोड्यांनी १२.६५ सेकंदात शर्यत पूर्ण करत दुसरा; तर विभीषण भोसले आणि सोनू सातपुते यांच्या बैलजोड्यांनी १२.६७ सेकंदात शर्यत पूर्ण करत तिसरा क्रमांक मिळविला.
यावेळी आमदार महेश लांडगे, पुणे जिल्हा बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष भानुदास लांडगे, माजी नगरसेवक रवी लांडगे, सागर गवळी, बाबासाहेब दरगुडे, काळुराम सस्ते, रोहिदास हवालदार, अण्णा भेगडे आदींसह बैलगाडा शर्यत शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही बैलगाडा शर्यत २८ ऑगस्ट ते १ सप्टेंबरपर्यंत घेण्यात आली. भोसरीसह पंचक्रोशीतील बैलगाडा शौकिनांनी स्पर्धेचा थरार अनुभवला. सुमारे ८३२ बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला.
पहिल्या दिवशी फळीफोडचा मान ओवी सुहास काशीद आणि आदिनाथ झेंडे यांच्या बैलजोड्यांनी १२.५८ सेकंदात शर्यत पूर्ण करत मिळविला. दुसऱ्या दिवशी विशाल कोतवाल आणि मंगेश थोरात यांच्या बैलजोड्यांनी १२.७१ संकेद घेत तर तिसऱ्या दिवशी दुर्योधन शिंगाडे आणि विलास नाणेकर यांच्या बैलजोड्यांनी १२.८० सेकंदात शर्यत पूर्ण करत फळीफोडचा मान पटकाविला. चौथ्या दिवशी मारुती केंदळे आणि दामू लांडगे यांच्या बैलजोड्यांनी १२.७४ सेकंद तर पाचव्या दिवशी राजू जवळेकर यांच्या बैलजोड्यांनी १२.५० सेकंद घेत हा मान पटकाविला. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अंकुश मळेकर, पांडुरंग सस्ते, रवींद्र लांडगे, शंकर लांडगे, लक्ष्मण गुळवे, राजू नेवाळे आदींनी परिश्रम घेतले. घड्याळ मास्तर म्हणून अशोक लांडगे, तुकाराम गवळी यांनी काम पाहिले. तर निशाण फडकविण्याचे काम संदीप माने यांनी पूर्ण केले. श्री आढळराव आणि माऊली पिंगळे यांनी निवेदन केले.
विजेत्या गाडा मालकांच्या बैलजोड्या
- पहिला दिवस - देवराम यशवंत काटे (१२.१० सेकंद), दुसरा दिवस - नितीन टिंगरे आणि अभिजित कराळे (१२.८७ सेकंद) तिसरा दिवस - शार्विलराजे गवारी आणि दत्ता पाचुनकर (१२.१५ सेकंद), चौथा दिवस - रामनाथ वारिंगे (१२.४९ सेकंद), पाचवा दिवस - गेनभाऊ आल्हाट आणि स्वप्नील मुळेकर (१२.५१ सेकंद).
घाटाच्या राजाचे मानकरी
- दिवस पहिला - देवराम काटे पाटील आणि सोहम बागडे (१२.२९ सेकंद), दुसरा दिवस - पंडित गावडे (१२.४४ सेकंद), तिसरा दिवस - शार्विलराजे गवारी आणि दत्ता पाचुनकर (१२.३६ सेकंद), तिसरा दिवस - तुषार मुटके आणि विठ्ठल पवार (१२.१९ सेकंद), पाचवा दिवस - गणेश सस्ते आणि नारायण पवळे (१२.१७ सेकंद).
कै. सदाशिव लांडगे, कै. जयवंत लांडगे, कै. रावसाहेब लांडगे, कै. आनंदराव लांडगे, कै. बबन गवळी यांनी शंभर वर्षांपूर्वी भोसरीतील बैलगाडा शर्यतीला सुरुवात केली. त्यांच्यानंतर ही परंपरा ज्ञानोबा लांडगे, शिवाजी लांडगे, अंकुशराव लांडगे यांनी पुढे सुरू ठेवली. चाळीस वर्षांपूर्वी पुण्यात गणेश फेस्टिवल सुरू झाल्यानंतर या फेस्टिवल अंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरात भोसरीत बैलगाडा शर्यत भरविण्यात आली. ही परंपरा आता भोसरीत स्वतंत्रपणे पुणे जिल्हा बैलगाडा संघटनेद्वारे सुरू ठेवण्यात आली आहे. ती अखंडपणे सुरू आहे.
- भानुदास लांडगे, पुणे जिल्हाध्यक्ष, पुणे जिल्हा बैलगाडा संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.