पवित्रतेमध्येच देवत्व ः जयंतीदीदीजी

पवित्रतेमध्येच देवत्व ः जयंतीदीदीजी

Published on

भोसरी, ता. ८ : ‘‘पवित्रतेतच देवत्व आहे. आपले विचार, वाणी आणि कृती या तिन्हीत पवित्रता आली; तर जीवनच मंदिर बनेल, असे मत ब्रह्माकुमारीज् संस्थेच्या अतिरिक्त मुख्य प्रशासिका राजयोगीनी जयंतीदीदीजी यांनी व्यक्त केले.
भोसरीतील इंद्रायणीनगर येथे ब्रह्माकुमारीज संस्थेच्या नवीन सेवा केंद्र होली पॅलेस या वास्तूच्या उद्‍घाटनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी माजी आमदार विलास लांडे, माजी नगरसेवक संजय वाबळे, विलास मडिगेरी, विक्रांत लांडे, नियत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी, डॉ. नारायण महाराज जाधव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह मुकुंद कुलकर्णी, लघुउद्योजक श्रीनिवास राठी आदींसह नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
ब्रह्माकुमारी संस्थेच्या विविध भागांतील संचालिका, कार्यकर्ते संचालिका करुणा दीदीजी, झोन इन्चार्ज सुनंदा दीदीजी,दशरथ भाईजी आदींनी मार्गदर्शन केले. सोहळ्यात गणेश वंदना, नृत्य, स्वागत गीत, अष्टमीवरील देवी नृत्य, सौगात सन्मान आणि दीवाळी उत्सव यांचा समावेश होता.

Marathi News Esakal
www.esakal.com