उमेदवारांसाठी आजचा दिवस धामधुमीचा

उमेदवारांसाठी आजचा दिवस धामधुमीचा

Published on

भोसरी, ता. २९ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी (ता.३०) शेवटचा दिवस आहे. तरीही, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपद्वारे सोमवारी (ता.२९) सायंकाळपर्यंतही उमेदवारांची यादी प्रसिद्ध होऊ शकली नाही. त्यामुळे इच्छुकांमध्ये संभ्रमाचे वातावरण दिसून आले.

सध्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. मात्र, विशिष्ट प्रभागांत विशिष्ट गटांत तिकीट मिळविण्यासाठी इच्छुक अडून बसल्याने बंडखोरी टाळण्यासाठी राजकीय पक्षांद्वारे उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात येत असल्याची चर्चा भोसरीतील मतदारांत आहे. त्यामुळे मंगळवारी (ता. ३०) उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस हा उमेदवारांसाठी धामधुमीचा ठरणार आहे.
भाजपद्वारे सोमवारी दुपारपर्यंत अधिकृत उमेदवारांची घोषणा झालेली नसली, तरी अंतर्गत गोटातून पक्षाने निश्चित केलेल्या उमेदवारांना माहिती दिली गेल्याने त्यांचा प्रचार प्रभागातून सुरू असल्याचे दिसते. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शिवसेना आदी पक्षांच्या काही उमेदवारांद्वारेही प्रचार होताना दिसत आहे. काही प्रभागांत राष्ट्रवादीच्या इच्छुकांद्वारे प्रभागातील विशिष्ट गटातील जागेसाठी आग्रह धरला गेल्याने प्रभागातील काही जागेवर राष्ट्रवादी काँग्रसचे उमेदवार प्रचार करताना दिसत आहेत. असे असले, तरी काही प्रभागात राष्ट्रवादीतूनच भाजपमध्ये पक्षांतर केलेल्या उमेदवारांसमोर कोणता उमेदवार द्यावा याचीही खलबते रंगत आहेत.

पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांद्वारे लक्ष
भाजपला पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ता टिकविणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता पुन्हा मिळविणे यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांद्वारे पिंपरी चिंचवड शहरातील उमेदवारांद्वारे राबविल्या जात असलेल्या प्रचार यंत्रणेवर वैयक्तिक लक्ष ठेवले जात आहे.


प्रचारातील ठळक मुद्दे
- प्रभागात चारही उमेदवारांनी एकत्रित प्रचार करण्याच्या भाजपच्या वरिष्ठांद्वारे सूचना
- उमेदवारांच्या एकत्रित प्रचाराची शहनिशा करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांद्वारे थेट व्हिडिओ कॉल
- राष्ट्रवादी काँग्रेसद्वारेही भाजपच्या उमेदवारांविरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी चाचपणी
- यादी जाहीर होण्यापूर्वीच भाजप, राष्ट्रवादीच्या उमेदवारांकडून प्रचार सुरू

उमेदवारांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रचार
काही उमेदवारांनी रस्त्यावर न उतरता प्रचारासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. विविध पक्षांच्या चिन्हांसह पोस्ट टाकत विविध समाज माध्यमांच्या ग्रुपद्वारे प्रभागात पक्षाच्या उमेदवारीवर दावा केला जात आहे. तर काही उमेदवारांद्वारे समाज माध्यमांसह प्रत्यक्ष मतदारांना भेटून मतदान करण्याचे आवाहन मतदारांना करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या उमेदवार मतदारांपर्यंत पोचत प्रत्यक्ष; तर काही उमेदवार अप्रत्यक्षपणे प्रचार करतानाचे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com