कर्तबगार महिलांचा सन्मान
भोसरी, ता. १० ः स्वरांजली कला क्रीडा मंचाद्वारे भोसरीतील गंगोत्री पार्कमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी सिनेअभिनेत्री मृणाल कुलकर्णी, नगरसेविका भीमाबाई फुगे, डॉ. रूपाली खाडे, नलिनी डोळस, सुरेखा यादव, सुरेखा गायकवाड, प्रज्ञा रामटेके आदी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुजाता पवार होत्या. दामिनी पथकातील पोलीस कर्मचारी मयुरी शिंगटे, माधुरी मोहारे, अग्निशमन दलाच्या फायरमन स्नेहा जगताप, मनिषा नवले, पूजा वलगुडे आदींचा कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्योती क्षेत्रे, अनुराधा थोरात, भाग्यश्री गायकवाड, वृषाली भालेराव आदींनी परिश्रम घेतले. मिताली वाघ यांनी प्रास्ताविक केले. प्रज्ञा डोळस यांनी सूत्रसंचालन केले. वृषाली भालेराव यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

