भोसरीत श्रीराम नवमीनिमित्त कीर्तन, मिरवणूक आणि आरोग्य शिबिर

भोसरीत श्रीराम नवमीनिमित्त कीर्तन, मिरवणूक आणि आरोग्य शिबिर
Published on

भोसरी, ता. २६ ः आरोग्य तपासणी शिबिर, अखंड हरिनाम सप्ताह, कीर्तन सप्ताह, श्रीराम जन्मोत्सव, श्रीराम मूर्तीची भोसरी परिसरातून मिरवणूक आदी कार्यक्रमांनी भोसरी परिसरात श्रीराम नवमी साजरी करण्यात आली.
भोसरीतील चक्रपाणी वसाहतीमधील श्रीराम मंदिरात रामनवमीनिमित्त आयोजित कीर्तन सप्ताहात अंकुश महाराज फुगे, प्रमोद महाराज गोगावले, सदानंद श्रीरंग महाराज चौधरी, ज्ञानेश्वर महाराज सावर्डेकर, दिगंबर महाराज ढोकले, भरत महाराज थोरात, नीलेश महाराज जाधव, सोपान महाराज फुगे आदींनी कीर्तन सेवा केली. शुक्रवारी (ता. २७) बाळासाहेब महाराज गुळवे यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.
रामनवमीनिमित्त पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. काकडा आरती, दुपारी महिला भजनी मंडळाचे भजन, सायंकाळी हरिनाम पाठ घेण्यात आला. सायंकाळी श्री राम मूर्तीची डीजे आणि ढोल ताशाच्या गजरात चक्रपाणी वसाहत, भोसरी-आळंदी रस्ता चौक, पीएमटी चौक, संविधान चौक, दिघी रस्ता या मार्गाने प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मिरवणूक काढण्यात आली.
आरोग्य तपासणी शिबिरात हृदय विकार, रक्तदाब, मधुमेह, सांधेदुखी, थायरॉईड आदी तपासण्या करण्यात आल्या.
नियोजन गुलाब कावरे, रवी शिंदे, उमाकांत पल्हाडे, अशोक महाराज गुळवे, राहुल महाराज गुळवे, संजय धावडे, सोमनाथ ठाकूर, जनार्दन गुळवे, लक्ष्मण गुळवे आदींसह श्रीराम मंदिर ट्रस्ट, श्रीराम जन्मोत्सव समिती, सामाजिक संघटनांनी केले.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com